पेट्रोलपंप चालकांचे इंधन खरेदी बंद आंदोलन ; १५ मे पासून एकच शिफ्टमध्ये करणार काम

0

नाशिक  : पेट्रोल डिलर्सच्या विविध मागण्यांबाबत सतत दोन वर्ष पाठपुरावा करून ही अपुर्‍या डिलर मार्जिनसह अन्य प्रलंबित मागण्यांबाबत पेट्रोलियम कंपन्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने जिल्ह्यातील 350 पेट्रोल पंपांवर 10 मे रोजी एक दिवस पेट्रोल खरेदी बंद आंदोलन केले जाणार आहे. मात्र या काळात जिल्हयातील सर्व पेट्रोलपंपावर इंधन विक्रि सुरूच ठेवण्याचा निर्णय नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर्स असोसिएशनच्या बैठकित घेण्यात आला.

नाशिक जिल्ह्यात भारत पेट्रोेलियम, इंडियन ऑइल व हिंदुस्थान पेट्रोेलियम या तीन सरकारी कंपन्यांचे मिळून 350 पेट्रोेल पंप आहेत.नाशिक शहरात 70 पेट्रोलपंप आहेत. सरकारी कंपन्यांच्या पेट्रोेलपंपांना खर्चाच्या तुनलेत पुरेसा परतावा मिळत नसल्याने पेट्रोल असोसिएशनने काही मागण्या तेल कंपन्यांकडे केल्या आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून संघटना याविषयी लढा देत आहे. मात्र तेल कंपन्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पेट्रोल डिलर्स असोसिएशनने केला आहे. तसेच कंपन्यांनी वारंवार याबाबत निर्णय घेण्यासाठी मुदत वाढवून मागितली ही मुदत 9 मे रोजी संपत असल्याने 10 मे रोजी एकदिवस खरेदी बंद आंदोलन करण्याचा निर्णय असोसिएशनच्या बैठकित घेण्यात आला.

तसेच खर्चात कपात करण्यासाठी कामकाजात काही बदल करण्यात येणार असून 15 मे पासून सकाळी 9 ते 6 या एकाच शिफटमध्ये पंप सुरू ठेवण्यात येणार असल्याचे असोसिएशनचे सचिव विजय ठाकरे यांनी सांगितले. या बैठकिप्रसंगी शंकरराव टाकेकर , नितीन धात्रक , आनंद काकड , भुषण भोसले आदि पदाधिकारी उपस्थित होते.

गेल्या दोन वर्षांपासून आम्ही आमच्या मागण्यांबाबत लढा देत आहोत. खर्चाच्या तुलनेत योग्य परतावा मिळावा अशी आमची मागणी आहे. मात्र तेल कंपन्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामूळे आता मागण्या मागण्या मान्य होत नसल्याने खर्चात बचत करण्याच्या दृष्टीने आम्ही हे पाउल उचलले आहे.
– विजय ठाकरे, सचिव, ना.जि.पेट्रोल, डिलर्स असो.

बैठकितील निर्णय : जिल्हा पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनने चार टप्प्यात आंदोलन हाती घेतले आहे. 10 मे रोजी एक दिवस खरेदी बंद आंदोलन करण्यात येणार आहे. 14 मे पासून दर रविवारी 24 तास पेट्रोल पंप बंद ठेवण्यात येतील. 15 मे पासून जिल्हयातील सर्व पंप सकाळी 9 ते सायंकाळी 6 या एकाच शिफटमध्ये सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

उत्तर प्रदेश घटनेचा निषेध : उत्तर प्रदेशमध्ये काही पेट्रोल व्यावसायिकांनी बेकायदेशीर काम करून पेट्रोल व्यवसायाला काळिमा फासला आहे. या घटनेचा या बेैठकित निषेध व्यक्त करण्यात आला. परंतू नाशिक जिल्हयात अशा कोणत्याही प्रकारचे चुकिचे काम पंपावर होत नाही. याबाबत नागरीकांनी काही तक्रार असल्यास डिलर, कंपनी अधिकारी , वजनमान अधिकारी किंवा संघटनेकडे तक्रार करण्याचे आवाहन सचिव विजय ठाकरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*