पेट्रोल, डिझेलचे नवे दर आता रात्री 12 ऐवजी सकाळी 6 पासून लागू होणार

0

देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर आता दररोज बदलणार आहेत.

पहिल्याच दिवशी  पेट्रोल 1.12 रुपयांनी, तर डिझेलच्या दरात 1.24 रुपयांची कपात झाली आहे.

विशेष म्हणजे आता रात्री 12 ऐवजी 6 पासून नवे दर लागू होतील.

विविध शहरातील हे दर उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत कायम राहतील. त्यानंतर नव्या दरांनुसार पेट्रोल, डिझेलची विक्री केली जाईल.

पेट्रोल पंप मालक आणि डिलर्स यांना फटका बसू नये, यासाठी देशभरातील 54 हजार पेट्रोल पंपांवर रात्री 12 ऐवजी सकाळी 6 वाजल्यापासून दर बदलतील.

कच्च्या तेलाचे दर नियमित ठरतात, त्यामुळे भारतातही दररोज दरात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

तेल कंपन्यांनी उदयपूर, जमशेदपूर, पुद्दुचेरी, चंदीगड आणि विशाखापट्टणम या शहरांमध्ये प्रायोगिक तत्तांवर दररोज दर बदलण्याचा नियम लागू केला.

या शहरांमध्ये हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर देशभरात हा नियम लागू करण्यात आला.

LEAVE A REPLY

*