Video : पेठ नगरपंचायतीत मुख्याधिकारी नेमण्याचे सहकार राज्यमंत्र्यांना साकडे

0
नाशिक | पेठ नगरपंचायतील मुख्याधिकारी नसल्यामुळे अनेक विकासकामे ठप्प झाली आहेत.  नगरपंचायत पंचायत अस्तित्वात येऊन दोन वर्षाचा कालावधी उलटला आहे. तरीही मुख्याधिकारी मिळत नसल्याने विकास कामे ठप्प झाली आहेत.

अशीच परिस्थिती राहील्यास नागरीकांच्या रोषास सामोरे जावे लागेल. या भीतीने सताधारी गटाच्या उपनगराध्याक्षांसह नगरसेवक मनोज घोंगे,कुमार मोंढे, प्रकाश धुळे, भाजपचे नगरसेवक भागवत पाटील यांनी थेट सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांचेकडे मुख्याधिकारी मिळावा यासाठी साकडे घातले आहे.

यापूर्वी देण्यात आलेले मुख्याधिकारी लांडे रजेचे कारण देऊन निघून गेल्याने मुख्याधिकारी आलेले नाहीत. दरम्यानच्या काळात त्र्यंबकच्या मुख्याधिकारी यांना पेठ नगरपंचायतीचा अतिरीक्त कार्यभार देण्यात आला. मात्र सदरची नियुक्ती केवळ नावालाच असून त्यांनी पेठ नगरपंचायतीकडे पाठ फिरविली  आहे.

लवकरात लवकर मुख्याधिकारी मिळावा यासाठी एका शिष्टमंडळाने थेट राज्यमंत्र्यांना साकडे घातले असल्यामुळे पेठ नगरपंचायातील नवा मुख्याधिकारी मिळणार असल्याची शक्यता वर्तविली जाते आहे.

LEAVE A REPLY

*