पेठजवळ पाठलाग करून मोटरसायकल पळवली

0

पेठ (प्रतिनिधी) दि ५ : येथून जवळील अंबापूर घाटात रात्री ८:३० वाजे दरम्यान फणस पाडा ( कापूर्ली ) येथील रहिवाशी असणारे धर्मराज मनोहर नावत्रे यांचा पाठलाग करून पाठीमागून मोटरसायकलवर  ३ तरुणांनी मोबाईल आणि मोटरसायकल हिसकावून पळ काढला.

संशयित २२ ते २५ वयोगटातील होते. त्यांनी नावत्रे यांना अडवून लाकडी दंडूक्याचा धाक दाखवला. आधी मोबाइल हिसकावून घेतला आणि नंतर  हिरो पॅशन प्रो क्रमांक जिजे २१बीबी O907 हिसकावली.

धर्मराज नावर्ते हे गॉस्पल पार्टनर्स मुव्हमेंट संस्थेत कार्यरत असून संस्थेनेच त्यांना कार्यालयीन कामासाठी सदरचे वाहन दिले होते.

या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून घटना घडून ४ दिवस उलटूनही गुन्हेगारांचा कुठलाही मागमूस लागलेला नसल्याने नागरीकांत भितीची भावना निर्माण झाली आहे.

 

LEAVE A REPLY

*