शिवसेनेत जाणार का? पंकजा मुंडेंनी अखेर सोडलं मौन

jalgaon-digital
1 Min Read

बीड | Beed

काही दिवसांपूर्वी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे बीड (Beed) जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या दौऱ्याला पंकजा मुंडे (Pankaja Munde) या अनुपस्थित राहिल्यामुळे भाजपच्या गोटात काहीतरी बिघडतंय असा सूर राजकीय वर्तुळात उमटू लागला होता…

नवीन सरकारच्या संरचनेत पंकजा मुंडेंना संधी देण्यात आली नाही यामुळे गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे या पक्षावर नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यातच पंकजा मुंडे मातोश्रीचे शिवबंधन हाती बांधणार असल्याचेही भाकीत वर्तविण्यात येत होते. यावर स्वत: पंकजा मुंडे यांनीच प्रतिक्रिया देत चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

त्यांनी याविषयी आपले मत स्पष्ट करत लोकांच्या मनातील गोंधळ मिटविण्याच्या प्रयत्न केला आहे. त्यांनी सांगितले आहे की, भाजपच्या कुशीतील वाढलेली मी खरीखुरी कार्यकर्ता आहे. भाजप आणि मुंडे साहेब यांना कधीही वेगळं करता येणार नाही, असं म्हणत त्यांनी पक्षप्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

त्याबरोबरच, भाजप पक्ष म्हणजे एक व्यक्ती नाही तर ती एक संस्था आहे, असं म्हणत त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. मी पक्षाचे सर्व प्रोटोकॉलचे पालन करते, असंही त्या यावेळी म्हणाल्या आहेत.

शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचारार्थ बीड जिल्ह्यातील गेवराईमध्ये जाहीर सभेचं आयोजन करण्यात आले होते यावेळी त्या सभेत बोलत होत्या. आपण पक्षावर नाराज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *