पंचकुला येथे हिंसाचार घडवण्यासाठी हनीप्रीतने वाटले सव्वा कोटी रूपये

0
नवी दिल्ली – डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहिमची दत्तक मुलगी हनीप्रीत हिने पंचकुला येथे हिंसाचार घडवण्यासाठी तब्बल सव्वा कोटी रूपये वाटल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष न्यायालयाने बाबा राम रहिमला बलात्कार प्रकरणात 25 ऑगस्टला दोषी ठरवल्यानंतर पंचकुला परिसरात त्याच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर जाळपोळ करून हिंसाचार घडवला होता. यावेळी झालेल्या हिंसाचारात 35 जणांचा बळी गेला होता.
हनीप्रीतने हे सर्वकाही घडवून आणल्याचा आरोप हरियाणा पोलिसांनी केला आहे. यासाठी तिने डेरा सच्चा सौदाच्या चमकोर सिंग व दान सिंग या दोन अनुयायांच्या माध्यमातून 1.25 कोटी रूपये हिंसा करणार्‍या लोकांना वाटले होते.
सध्या हनीप्रीत पोलीस कोठडीत असून तिच्या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे. तर चमकोर सिंग आणि दान सिंग यांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे.
हनीप्रीतला पंजाबमधील झिरकापूर – पतियाळा रस्त्यावरुन अटक केली होती. हनीप्रीत चौकशीदरम्यान सहकार्य करत नाही, असे पोलिसांनी म्हटले होते.
पंचकुलातील हिंसाचारासाठी जबाबदार असलेल्या 43 मोस्ट वाँटेड गुन्हेगारांची यादी हरयाणा पोलिसांनी प्रसिध्द केली होती. यामध्ये हनीप्रीत आणि आदित्य इन्सान यांचाही समावेश होता.
नेपाळमध्ये पळून गेले नव्हते तर पंजाबमधील भटिंडा येथील डेरा समर्थकाच्या घरात लपून बसले होते, असे हनीप्रीतने पोलिसांना सांगितले.

 

LEAVE A REPLY

*