संस्था नोंदणी प्रमाणपत्र आता ऑनलाईन मिळणार

0
धर्मादाय आयुक्त कार्यालयातील एजंटगिरीला चाप
अहमदनगर (प्रतिनिधी) – धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून मिळणारे संस्था नोंदणी प्रमाणपत्र आता ऑनलाईन मिळणार आहे.  यापुर्वी न्यास नोंदणी करण्यासाठी सहा-सहा महिने मारावे लागणारे हेलपाटे थांबणार असून संस्था नोंदणी प्रक्रिया राबविण्यासाठी एजंटकडून मोठ्या प्रमाणात होणारी आर्थिक लुट थांबणार आहे.
सर्व प्रक्रिया यापुढे ऑनलाईन होणार असल्याने कार्यालयातील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.याशिवाय परिपूर्ण प्रस्ताव सादर केल्यास एकाच दिवसात प्रमाणपत्र हातात मिळणार आहे. ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर प्रकरण कोणत्या स्तरावर आहे.याची माहिती मोबाईल एसएमएसव्दारे मिळणार आहे. महाराष्ट्र राज्याचे धर्मादाय आयुक्त श.भां सावळे यांनी खात्याचा कारगार घेतल्यानंतर सर्व कामकाज डिजीटल व स्मार्ट करण्यावर भर दिला आहे. त्यामूळे नगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील धर्मादाय उपायुक्त कार्यालयातील काम ऑनलाईन होणार आहे. कार्यालयातील विविध कामांसह सोसायटी नोंदणी, न्यास नोंदणी, बदल अर्ज दाखल करणे, धर्मादाय कार्यासाठी वर्गणी गोळा करण्याची परवानगी, लेखा परिक्षण अहवाल दाखल करणे आदी कामे ऑनलाईन करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात 22 हजार संस्था – 
आता पर्यत जिल्ह्यात सुमारे 22 हजार संस्थांची नोंदणी झाली आहे.दररोज धर्मादाय उपयुक्त कार्यालयात सोसायटी/ संस्था नोंदणी, बदली अर्ज, लेखा परिक्षण व इतर कारणांसाठी शेकडो अर्ज प्राप्त होतात. ऑनलाईन प्रकियेमुळे कर्मचारी व अधिकार्‍यांची डोकेदुखी कमी होणार हे निश्‍चित.

सहायक धर्मादाय आयुक्त व्ही. बी. घाडगे यांच्या हस्ते व अधिक्षक उत्तम गावडे, लेखापाल उमेश ढोले, वरिष्ठ लिपिक साधनो जाधव यांच्या उपस्थित सुरेंद्र चव्हाण यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

सुरेंद्र चव्हाण पहिले मानकरी
एकाच दिवसात नोंदणी प्रमाणपत्र –
नेवासा तालुक्यातील सुरेंद्र चव्हाण यांनी श्री शंभुराजे फाऊंडेशनच्या नोंदणी साठी ऑनलाईन प्रकियेनंतर पहिलाच प्रस्ताव दाखल केला होता. परिपूर्ण प्रस्ताव सादर केल्याने एकाच दिवसात ऑनलाईन पहिले प्रमाणपत्र मिळण्याचा मान चव्हाण यांना मिळाला. सहायक धर्मादाय आयुक्त व्ही. बी. घाडगे यांच्या हस्ते व अधिक्षक उत्तम गावडे, लेखापाल उमेश ढोले, वरिष्ठ लिपिक साधनो जाधव यांच्या उपस्थित सुरेंद्र चव्हाण यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

LEAVE A REPLY

*