35 हजार शेतकर्‍यांच्या खात्यावर कांदा अनुदान वर्ग

0

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील पात्र 45 हजार 649 शेतकर्‍यांपैकी 35 हजार 500 शेतकर्‍यांच्या खात्यावर 8 ऑगस्टअखेरपर्यत सुमारे 15 कोटी रुपयांचे कांदा अनुदान वर्ग करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिली. जुलै-ऑगस्ट 2016 मध्ये कांद्याच्या भावात घसरण झाल्याने बाजार समितीमध्ये माल विकणार्‍या शेतकर्‍यांना प्रती क्किटंल शंभर रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.

त्यानुसार शेतकर्‍यांनी प्रस्ताव तयार केले. राज्यात सर्वाधिक अनुदान नगर जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकर्‍यांना अनुदान मंजूर झाले. 45 हजार 649 शेतकर्‍यांना 17 कोटी 99 लाख रुपये मंजूर झाले. त्यापैकी 35 हजार शेतकर्‍यांना 19 जुलै ते 9 ऑगस्टपर्यंत 14 कोटी 99 लाख रुपये देण्यात आले आहे. उर्वरीत 10 हजार शेतकर्‍यांना 3 कोटी 43 हजार रुपये वर्ग करण्यात येत आहे. सहकारी बँकेत खाते असणार्‍या शेतकर्‍यांचे अनुदान वर्ग झाले. मात्र, राष्ट्रीय बँकेत अडचणी येत असल्याने वेळ लागत असल्याचे सांगण्यात येते. अनुदान वर्ग न झालेल्या दहा शेतकर्‍यामधे नगर, नेवासा, राहुरी, कोपरगाव तालुक्यातील शेतकरी संख्या अधिक आहे.

LEAVE A REPLY

*