वाकी खुर्द शिवारात रेल्वेतून खाली पडल्याने एकाचा मृत्यू

0

चांदवड : चांदवड तालुक्यातील वाकी खुर्द शिवारातून गेलेल्या मनमाड – लासलगाव मध्यवर्ती रेल्वे लाईनवरील खांब क्र. २३९/२ ते २३९/४ चे दरम्यान रेल्वेतून प्रवास करणाऱ्या अंदाजे २६ वर्ष वयाच्या तरुणाचा तोल जाऊन रेल्वेतून खाली पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.

मनमाड येथील मध्यवर्ती रेल्वे स्थानकावरून नाशिककडे जाणाऱ्या रेल्वेतून शनिवार (दि.२०) रोजी दुपारी २ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास घडली आहे.

या घटनेसंदर्भात लासलगाव येथील रेल्वेचे व्यवस्थापक एस. व्ही. सुरवाडे यांनी चांदवड पोलिसात खबर दिली आहे. चांदवड पोलिसांनी सदर घटने संदर्भात घटनास्थळी जाऊन पंचनामा करीत उत्तरीय तपासणीसाठी मयताचे शव चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आणले होते.

या घटनेसंदर्भात पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

LEAVE A REPLY

*