निवडणूक कामात हलगर्जीपणाः मनपा शिक्षणाधिकार्‍यांना नोटीस

जिल्हा प्रशासनाने मागितला खुलासा ः बीएलओंवर होणार कारवाई

0
नाशिक | दि. ६ प्रतिनिधी – निवडणूक आयोगाच्यावतीने राबविण्यात येणारया मतदार पुनरिक्षण मोहीमेच्या कामात हलगर्जीपणा करणारया मतदान कंेंद्रस्तरीय अधिकारयांवर बीएलओ गुन्हे दाखल करण्याच्या नोटीसा प्रशासनाने काढल्यानंतर संबधित बीएलओ कामाला लागले आहे.

मात्र बीएलओंच्या नियुक्तीबाबत जिल्हाधिका-यांनी महापालिका आयुक्तांना नोटीस काढल्याचा मुद्दा चर्चेत असतानाच आता मनपा शिक्षणाधिका-यांनाही दोन बैठकांना गैरहजर असल्याची कारणे दाखवा नोटीस काढली आहे. त्यामुळे सबळ कारणासह त्वरीत खुलासा करण्याची वेळ मनपा शिक्षणाधिकारी नितीन उपासणी यांच्यावर आली आहे.

आयोगाच्यावतीने १५ ते ३० नोव्हेंबरपर्यंत राबविण्यात आलेल्या मतदार पुनरिक्षण मोहीमेत ७ लाखापैकी अवघ्या ८ हजार घरांनाच भेटी दिल्याने आयोगाने याबाबत नाराजी दर्शवली. यात अनेक बीएलओंनी काम करण्यास नकार दिला तर काही बीएलओंनी दप्तरच ताब्यात घेतले नसल्यची बाब समोर आली.

परिणामी कामे पुर्णपणे थांबले आहे. अहसहकार दर्शविणा-या ७५० बिएलओंवर (बुथ लेवल अधिकारी) गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिल्यानंतर लागलीच बिएलओंनी कामे करण्यास सुरुवात केली. परंतु मनपा हद्दीतील, मनपा शाळांच्या शिक्षकांनीही त्याकडे दुर्लक्ष केल्याने आता नाशिक पुर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक नोंदणी अधिका-यांनी मनपा शिक्षणाधिकारी नितीन उपसणी यांनाच यात दोषी धरले आहे.

तेच बैठकांना येत नसल्याने त्यांच्या शाळांचे शिक्षकही या मोहीमेस गंभीरपणे घेत नाही. दोनदा बैठकांना बोलावूनही उपासणी हजरच राहीले नसल्याने आता त्याचा त्यांनाही खुलासा करण्यासाठी नोटीस काढण्यात आली आहे. त्यामुळे मतदार नोंदणीमुळे मनपा आणि निवडणूक विभागाच चांगलीच जुंपली आहे.

१७ शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई
पुर्व विधानसभा मतदार संघात नोंदणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या १७ बिएलओंनी कामच केले नाही. त्यामुळे निवडणुक कामात कसूर करणा-या या बिएलओंवर आपल्या स्तरावर योग्य कारवाई करावी. याचा अहवाल लागलीच मतदार नोंदणी अधिकार्‍यांना सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*