बेकायदेशिर बांधकामाबाबत निमसे यांना नोटीस

बेकायदेशिर बांधकाम केल्याबद्दल नगरसेवक पद रद्दची मागणी

0

नाशिक । नांदूर नाका परिसरात पक्षांचे कार्यालय बांधण्याबरोबरच बेकायदेशिर दुकाने व पत्र्याचे शेड उभारल्याच्या तक्रारीवरुन महापालिका नगररचना विभागाने भाजपा नगरसेवक तथा स्थायी समिती माजी सभापती उद्धव निमसे यांना नोटीसा पाठविल्या आहे.

या नोटीसांना मुदतीत उत्तर न दिल्यास पुढील कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान निमसे यांनी बेकायदेशिर अतिक्रमणाला मदत केली म्हणुन त्यांचे नगरसेवक पद रद्द करावेत अशी मागणी या भागातील नागरिकांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

पंचवटी विभागातील नांदूरनाका भागात नगरसेवक उद्धव निमसे यांनी आपल्या मालकीच्या जागेवर बेकायदेशिर रित्या द्वारका स्विट नावाचे दुकान व पत्र्याचे शेड उभारले आहे. तसेच विजया लक्ष्मी व लक्ष्मी विजय हे लॉन्स देखील अनाधिकृत उभारले आहे.

त्याचबरोबर नांदूरनाका भागात निमसे यांनी गांगुर्डे यांच्या जागेत बेकायदेशिर पणे आपले कार्यालय थाटले आहे असुन या भागातील काही दुकाने अनाधिकृत आहे. अशाप्रकाराच्या तीन तक्रारी तीन तक्रारी गेल्या काही दिवसांपुर्वी महापालिका आयुक्तांकडे आल्या होत्या. याची दखल आयुक्त आणि नगररचना विभागाने घेत नगरसेवक निमसे यांना नोटीसा पाठविण्यात आल्या आहे.

या नोटीसांत निमसे यांच्या मालकीच्या जमिनीवर 10 बाय 7 मीटर आकाराचे पत्र्याचे शेड उभारुन याठिकाणी द्वारका स्विट दुकान सुरू करण्यात आले असुन हे पत्र्याचे शेड अनाधिकृत आहे. तसेच शरद शंकर गांगुर्डे यांच्या जागेवर निमसे यांनी बेकायदेशिर पणे पाच बाय सात मीटर आकाराचा गाळा उभारुन यात नगरसेवक कार्यालय सुरू केले आहे.

तसेच नांदूर शिवार औरंगाबादरोड रस्त्यालगत लक्ष्मी विजय व विजय लक्ष्मी लॉन्सचे बेकायदेशिर पणे उभारणी केली आहे. असे नमुद करीत नगररचना विभागाने निमसे यांना नोटीस पाठविली आहे. यात हे बेकायदेशिर बांधकाम तोडण्याची कायदेशिर कारवाई का नये?

अशी विचारणा करीत नगररचना विभागाकडे खुलासा करण्याचे सांगण्यात आले आहे. निमसे यांना दिलेल्या नोटीसांवरुन त्यांनी बेकायदेशिररित्या बांधकाम केल्याबाबत विचारणा करण्यात आली आहे. त्यामुळे येणार्‍या काळात निमसे यांच्याकडुन कोणता खुलासा केला जातो आणि त्यावर महापालिका कोणती कारवाई करते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

*