पुरुषोत्तमनगर येथे ‘सहकार चळवळ’वर चर्चासत्र

0
शहादा । ता.प्र.-प्रचलीत सहकारी कायद्यातच सहकारी संस्था मोडीत निघतील असे कायदे आहेत. त्यामुळे सहकारी संस्था चालविणे कठीण झाले आहे म्हणुन सहकारी कायद्यात अमुलाग्र बदल करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय संरक्षक सहकार भारती व एन.सी.डि.सी. नवी दिल्लीचे संचालक सतिष मराठे यांनी सातपुडा साखर कारखान्याच्या सभागृहात सहकार चळवळ या विषयावरील चर्चासत्रात व्यक्त केले.
तालुक्यातील पुरुषोत्तमनगर येथील सातपुडा साखर कारखान्याच्या सभागृहात सहकार चळवळ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रीय संरक्षक सहकार भारतीचे व एन.सी.डि.सी.नवी दिल्लीचे संचालक सतिष मराठे तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सहकार भारतीचे प्राचार्य मुकुदराव तापकिर तसेच महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री सहकार भारती दिलीपदादा पाटील, धुळे येथील गोपाळराव केले, सातपुडा कारखान्याचे माजी चेअरमन कमलताई पाटील, सामाजिक कार्यकर्ते भिमसिंग राजपुत, डॉ.कांतीलाल टाटीया, सनदी लेखापाल श्रीराम देशपांडे, प्रकाश जी.पाठक, कारखाना, सुतगिरणी, खरेदी विक्रीसंघ मार्केट कमिटी, दुध संघ अनेक पतसंस्था व बँकाचे पदाधिकारी या कार्यक्रमात उपस्थित होते.

सतिष मराठे म्हणाले की, देशभरात जवळपास 6.50 लाख सहकारी संस्था असुन 22 हजार कोटीच्या जवळपास सभासद या सहकारी चळवळीत जुडलेले आहेत एवढे मोठे क्षेत्र सहकारी संस्थानी व्यापले असुन सहकारी कायद्यात अनेक अडथळे असून या संस्थाना स्वायत्तता नाही, त्यामुळे या संस्थाची प्रगती होत नाही.

सहकारी कायद्याची निर्मिती ही राज्याच्या आणि देशाच्या परिस्थितीनुरुप आणि विशाल दृष्टीकोन ठेवुन करावा लागेल सहकारी संस्थाना जे भाग भांडवल उभे करायचे असते त्याला मर्यादा या कायदयात असून सर्वात मोठा प्रश्न संस्थांपुढे उभा आहे ही मर्यादा वगळली तर या सहकारी संस्था नक्कीच भरभराटीस येतील यावर त्यांनी भर दिला.

खाजगी संस्था केवळ नफा मिळविण्याच्या दृष्टीने निर्माण झाल्या असून ठराविकच लोेकांची प्रगती त्यामध्ये दिसून येते म्हणुन सामान्य माणसाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सहकाराशिवाय पर्याय नाही.

सहकारी कायद्यात अनेक कायदे सहकारी संस्थांच्या कार्यप्रणालीत अडसर येतात म्हणुन खर्‍याअर्थाने प्रगती झालेली दिसत नाही.

ग्रामीण अर्थव्यवस्था सृदृढ करण्याकामी सहकाराशिवाय अशक्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच मुकुंदराव तापकिर आणि दिलीपदादा पाटील सहकार चळवळीचे फायदे व तोटे यांचा ऊहापोह केला.

कार्यक्रंमाचे प्रस्ताविक कार्यकारी संचालक पी.आर.पाटील यांनी केले. सुत्रसंचलन मुख्यहिशोबनीस सी.जी. पाटील यांनी केले.

 

LEAVE A REPLY

*