नोकियाचे ॲन्ड्रॉइड फोन आजपासून भारतात विक्रीला उपलब्ध

0

नोकिया ब्रँडचे बहुचर्चित नोकिया ६, नोकिया ५ आणि नोकिया ३ हे ॲन्डॉईड फोन आजपासून भारतात विक्रीला उपलब्ध आहेत.

नोकिया ५ आणि ३ हे स्टोअर्समध्ये उपलब्ध असून नोकिया ६ मात्र केवळ ॲमेझॉनवरच विकत घेता येणार आहे.

साडेपाच इंची स्क्रीनचा आकार, फुल एचडी, ३ जीबी रॅम, ३२ जीबी इंटर्नल स्टोअरेज, गोरिला ग्लास, फिंगर प्रिंट सेन्सर आदि वैशिष्ट्ये असलेल्या नोकिया ६ ची किंमत १४९९९ रु इतकी आहे. त्यातील प्राथमिक कॅमेरा १६ मेगा पिक्सेल आणि सेल्फी कॅमेरा ८ मेगा पिक्सेल क्षमतेचा आहे.

यातील काळ्या रंगाची आवृत्ती ६४ जीबी इंटर्नल स्टोअरेज आणि ४ जीबी रॅमसह उपलब्ध आहे.

नोकिया ५ मध्ये २ जीबी रॅम, १६ जीबी इंटर्नल स्टोअरेज असून त्याची किंमत १२८९९ इतकी आहे.

नोकिया ३ मध्ये ९४९९ रुपयात उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

*