श्रीगोंद्यात खा.संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध

0
श्रीगोंदा (प्रतिनिधी) – जैन मुनी आणि जैन समाजाबाबत खा. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ श्रीगोंदा शहरातील जैन समाजाच्यावतीने मूक मोर्चा काढत तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन खा. संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.
याबाबत पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी समीर बोरा, संदीप मुथा, सतीश पोखरणा, ईश्वर बलदोटा, भूषण गांधी, संतोष सोनी व्यापारी असोसियशनचे अध्यक्ष सतीश बोरा, माणिक गांधी, नवनीत मुनोत, निलेश मेहेर, राहुल गांधी, लौकिक मेहता, महावीर पटवा, गणेश गुगळे, अशोक बोरा, सुरेश भांडारी, किशोर पालीवाल, आदींसह जैन समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमच्या श्रद्धा स्थानाबाबत अशी वक्तव्ये करणे चुकीचे आणि निषेधार्ह आहे. आमची कुठल्याही राजकीय पक्षाच्या विरोधात भूमिका नाही. केवळ अशी वक्तव्ये करणार्‍या व्यक्तीला विरोध असल्याचे पोखरणा म्हणाले.

LEAVE A REPLY

*