Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:48:01 hrs

मुख्य पान | राष्ट्रीय | ईद-उल-फित्र उत्साहात
ईद-उल-फित्र उत्साहात
Nashik(22-September-2009)
Tags : Nashik,News,National
 

नाशिक, दि.21 (जि. का. प्रतिनिधी)- शहर परिसरात पवित्र ईद-उल-फित्र सण मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात, शांततेत साजरा केला. शाहजानी ईदगाह मैदान येथे खतीब-ए-नाशिक हाजी हाफीज हिसामोद्दीन खतीब अशरफी यांच्या नेतृत्वाखाली सुमारे दीड लाख मुस्लिम बांधवांनी ईदची सममूहिक नमाज अदा केली. यावेळी राजकीय नेते व पोलीस अधिकार्‍यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. रमजानचे 29 रोजे पूर्ण झाल्यावर परवा (दि.20) सायंकाळी चंद्र दर्शनाची शरई ग्वाही मिळाल्यानंतर नाशिक सुन्नी सिरत कमिटीतर्फे आज ईदचा सण साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार 21 रोजेपासून शहरातील विविध मशिदींमध्ये एतेकाफमध्ये बसलेले मुस्लिम बांधव मशिदीबाहेर आले. ईदची खरेदी शहरातील भद्रकाली, शिवाजीरोड, मेनरोड आदी बाजारात पहाटेपर्यंत सुरू होती. आज ईद-उल-फित्रची विशेष नमाज शहरातील काही मशिदींमध्ये सकाळी 8 ते 9 वाजेदरम्यान स्थानिक पेशईमामांच्या नेतृत्वाखाली पठण करण्यात आली तर मुख्य सोहळा शाहजानी ईदगाह मैदान येथे सकाळी साडेनऊ वाजता सुरू झाला. येथे जमलेल्या सुमारे दीड लाख मुस्लिम बांधवांना हाजी मीर मुख्तार अशरफी व यानंी इस्लाम धर्म हा मानतेची, एकतेची, बंधुभावाची शिकवण देणारा असून मुस्लिम बांधवांनी पैगंबर साहेबांनी दाखविलेल्या सुन्नत मार्गाने आपले जीवन जगण्याचे आवाहन केले. सकाळी दहाच्या सुमारास मुख्य नमाजच्या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी खतीब-ए-नाशिक यांनी नमाज पठण करण्याची पध्दत सांगून ‘अल्लाहोअकबर’ म्हणून नमाजला प्रारंभ केला. सहा तकबीरने पठण करण्यात येणारी ईदची नमाज दहा मिनिटात झाली. यानंतर खतीब साहेबांनी पवित्र खुतबाचे अरबी भाषेत सामूहिक पठण केले. यानंतर पावसासह देशातील शांतता, एकात्मता, प्रगती व नाशिकच्या प्रगती, उन्नतीसाठी विशेष दुआ केली. हे कार्यक्रम झाल्यावर उपस्थितांनी उभे राहून पैगंबर साहेबांवर पवित्र सलातोसलाम पठण केले. यानंतर पुन्हा दुआ होऊन मुख्य सोहळा समाप्त करण्यात आला. यावेळी एकमेकांनी आलिंगन देत ईद मुबारक शुभेच्छा दिल्या. मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, पोलीस आयुक्त व्ही. डी. मिश्रा, महापौर विनायक पांडे, शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील बागूल, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस वसंत गिते, माजी महापौर दशरथ पाटील, राजेंद्र देसाई, रुषी चौधरी, श्रमिक सेनेचे कार्यध्यक्ष भगवंत पाठक, शहर उपाध्यक्ष जाकीर बशीर, डॉ. दिनेश बच्छाव, नरेश पाटील, शाहू खैरे, कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष साजिद याकूब खान, अल्पसंख्याक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष शेख हनीफ बशीर, नागरी सेवा समितीचे शेख ताहीर इनायत, रा.कॉं. अल्प. विभाग प्रदेश सरचिटणीस गुलजार कोकणी, नईम मामू, संपत जाधव, नाना महाले, राजेंद्र बागूल, गोकुळ पिंगळे, नैय्या खैरे, नसरोद्दीन बाटलीवाला, नगरसेवक हाजी बिलाल खतीब, शेखन खतीब, पोलीस उपायुक्त सुभाष निलेवाड, सहाय्यक आयुक्त सुभाष थोरात यांच्यासह सर्वधर्मीय व पक्षीय नेते तथा पोलीस अधिकारी उपस्थित होते. ईदगाह येथून परततांना दूध बाजार येथे भद्रकाली पोलीस ठाणे, शांतता समिती, मोहल्ला कमिटीतर्फे मंडप उभारून शुभेच्छा देण्यात आल्या. मुस्लिम बांधवांनी बडी दर्गा शरीफ तसेच कब्रस्तानांमध्ये जाऊन फातेहा पठण करण्यासाठी गर्दी केली होती. लहान मुलांनी मोठ्यांना सलाम करुन आशीर्वाद घेतले. लहान मुलांना यावेळी ईदी रुपाने पैसे देण्यात आले. मुस्लिम बांधवांनी नवीन कपडे, पठाणी सूट तसेच इस्लामी टोप्या परिधान केल्या होत्या. दुपारपर्यंत एकमेकांच्या घरी जाऊन ईद मुबारकच्या शुभेच्छा देण्याचा सिलसिला सुरू होता. मिश्रा खरे जनतेचे आयुक्त दरवर्षीप्रमाणे ईदगाह मैदानावर शुभेच्छा देण्यासाठी पोलीस आयुक्तालयातर्फे मंडप उभारण्यात आला होता. मात्र त्यात यावर्षी एकाही राजकीय नेत्याला प्रवेश नव्हता. त्यात फक्त पोलीस आयुक्त व वरिष्ठ अधिकार्‍यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. त्यामुळे ‘मी जनतेचा आयुक्त आहे’, असे म्हणणार्‍या आयुक्त मिश्रा यांचे बोल खरे आहेत, अशी चर्चा सुरू होती. नेत्यांसाठी दुसरा मंडप टाकण्यात आला होता.


प्रिंट काढा