Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत नगरला 15 सुवर्णपदक   ‘स्टेन’गनपुढे धोनी धुरंधर ढेर   बॅण्ड कलाकारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा   वेश्यांच्या राड्याने नागरिक त्रस्त   पाच वर्षांत राष्ट्रीय समविकास योजनेचा निधी अखर्चित   ठाकूर पिंपळगावनजीक अपघातात तिघे गंभीर जखमी   ‘प्रयास’मुळे तरुणाईला सामाजिक दिशा मिळेल ः डॉ. पठारे   शहर बससाठी महामंडळाच्या हालचालींना वेग   जिल्हा परिषद अध्यक्षा विखे यांना राज्यस्तरीय सावित्री पुरस्कार   साक्षीदाराने आरोपींना ओळखले   केडगावचा पाणीपुरवठा विस्कळीत   मनपाकडून अशोका हॉटेल पुन्हा सील   पोटभाडेकरूंमुळे मनपाला 3 कोटींचा फटका   तंटामुक्त मोहिमेत श्रीगोंदा-पारनेर आघाडीवर   सरपंचाकडून खुनाची धमकी; वनक्षेत्रपालांचे निवेदन   प्राणाराम व ध्रानधारणा सर्व रोगांवरचे निःशुल्क औषध ः प्रा. निमसे   खांड प्रकल्पास निधी कमी पडू देणार नाही ः ना. पवार   Updated on February 9, 2010, 03:27:26 hrs

मुख्य पान | निफाड, पिंपळगाव, लासलगाव, उगावसह सर्वत्र ईद उत्साहात
निफाड, पिंपळगाव, लासलगाव, उगावसह सर्वत्र ईद उत्साहात
निफाड, दि. 21 (प्रतिनिधी)- (22-September-2009)
Tags : Nashik,Regional
 

येथील मुस्लिम बांधवांनी ईद उल फितर रमजान ईद उत्साहपुर्ण वातावरणात पारंपारिक पद्धतीने साजरी केली. सकाळी 6 वा. येथील ईदगाह मैदानावर मौलाना मोहंमद काशिद यांच्या नेतृत्वाखाली सामुदायिक नमाज पठण करण्यात आले. या वेळी निफाड व परिसरातील मुस्लिम बांधव अबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. पवित्र रमजान महिन्याचे पुर्ण 30 दिवसांचे उपवास केल्याबद्दल हिंदू बांधव शामलाल हरिभाऊ बागडे, मुन्ना ईश्वरलाल परदेशी, फकिरा पवार यांचा मौलानांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी पोलिस निरीक्षक रामचंद्र देसाई, तलाठी सोमनाथ खैरे, माजी सरपंच अनिल कुंदे, मुकूंद होळकर आदींसह नमाज पठणासाठी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पिंपळगाव बसवंतला ईद उत्साहात पिंपळगाव बसवंत, दि. 21 (प्रतिनिधी)- येथे मुस्लिम बांधवांच्या वतीने रमजान ईद पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सकाळी जामा, मदिना मशिदीपासून मुस्लिम बांधवांनी मिरवणूकीने ईदगाह मैदानाकडे प्रस्थान केले. जामा व मदिना मशिदीचे दोन्ही मौलाना, मुस्लिम सदरचे पंचकमेटीचे मेंबर सोहेबुद्दीन काझी, गुलाबचाचा, जाकीर खान पठाण, गफ्फार शेख, मोहेउद्दीन काद्री, इलियम अत्तार, फरिद शेख, बाबुउद्दीन पटेल, जमील पटेल, फिरोजखान पठाण, इक्बाल शेख (मेंबर) आदी मान्यवरांसह परिसरातील खेड्यापाड्यातून आलेल्या त्याचप्रमाणे टोमॅटो खरेदीसाठी परप्रांतातून आलेल्या शेकडो मुस्लिम बांधवांनी मिरवणूकीत सहभाग घेतला. आ. दिलीप बनकर, अनिल पा. कदम, यतीन कदम, पिंपळगावचे सरपंच भास्करराव बनकर, उपसरपंच सुरेश खोडे, तानाजीराव बनकर, बाळासाहेब बनकर, सोमनाथ तात्या मोरे, गणेश बनकर, प्रकाश गोसावी आदींनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. पो. निरीक्षक विलास कोहिनकर, पो. उपनिरीक्षक शिवाजी कदम यांचेसह पोलिस शिपाई, होमगार्डस्नी चोख बंदोबस्त ठेवला. लासलगावला ईद उत्साहात लासलगाव, दि. 21 (वार्ताहर)- येथील मुस्लिम बांधवांनी ईद उल फितर रमजान ईद उत्साहपुर्ण वातावरणात पारंपारिक पद्धतीने साजरी केली. येथील ईदगाह मैदानावर मौलाना साबीर आली बरकाती यांच्या नेतृत्वाखाली सामुदायिक नमाज पठण केले. ईदगाह आवार अपुरे पडल्याने मैदानाबाहेरही नमाज पठण करण्यात आले. या वेळी लासलगावसह परिसरातील मुस्लिम बांधव अबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. लासलगाव येथील ग्रामस्थांतर्फे सरपंच जयदत्त होळकर यांनी मौलाना बरकाती यांचा सत्कार करुन आपले मनोगत व्यक्त करतांना मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. पोलिस प्रशासनातर्फे सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, तलाठी डी.टी. धाकराव, उपसरपंच संतोष ब्रम्हेचा, राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्ष मधुकर गावडे, गोकुळ पाटील, ज्येष्ठ नागरीक संघातर्फे वसंतराव सोनवणे, बाळासाहेब सोनवणे, ग्रा.पं. सदस्य डॉ. कैलास पाटील, चंदुलाल झांबरे, अनिल शेजवळ, हेमंत पवार, प्रफुल्ल कुलकर्णी आदींनी मौलाना बरकातीचा सत्कार करुन ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या. समाजातर्फे मान्यवरांसह मौलाना तसेच एतेकाफ करणार्‍या व्यक्तींचा सत्कार पाच वर्षाच्या मोसीम मुसा शेख या बालकाने महिनाभर रोजे पुर्ण केल्याबद्दल विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. अ.अजीज शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उगावला ईद उत्साहात उगाव, दि. 21 (वार्ताहर)- मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ईद उल फितर रमजान ईद उगाव परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील ईदगाहमध्ये मौलाना फारुख शेख यांच्या नेतृत्वाखाली सामुदायिक नमाज पठण करण्यात आले. यावेळी उगाव, खेडे, रानवड येथील मुस्मिल बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमाज पठणानंतर उपस्थित मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. हिंदू बांधवांनीही मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.


प्रिंट काढा