Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:31:51 hrs

मुख्य पान | श्रीगोंद्यातील रुग्णसेवा ‘स्ट्रेचर’वर
श्रीगोंद्यातील रुग्णसेवा ‘स्ट्रेचर’वर
बापूराव नागवडे(09-January-2010)
Tags : Ahmednagar,Regional
 

श्रीगोंदा, दि. 8 - सर्वसामान्य रुग्णांना वेळेवर व योग्य उपचार मिळावेत यासाठी तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयासह तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र व 34 आरोग्य उपकेंद्र असली तरी संबंधितांच्या अनास्था वृत्तीमुळे तालुक्यातील आरोग्यसेवाच ‘स्ट्रेचर’वर असल्यासारखी स्थिती आहे. वैद्यकीय अधिकार्‍यांच्या बेफिकिरीमुळे रुग्णांना विनाउपचार माघारी जाऊन खासगी रुग्णालयांमधून महागडा औषधोपचार घ्यावा लागतो. त्यामुळे तालुक्यातील आरोग्य सेवेच्या शस्त्रक्रियेचीच गरज निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील विविध आजारांच्या रुग्णांना वेळेवर व विनाशुल्क आरोग्य सेवा लवकरात लवकर व जवळच्या अंतरावर उपलब्ध व्हावी या हेतूने तालुक्यात जिल्हा रुग्णालयाच्या देखरेखीखालील ग्रामीण रुग्णालय व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची आढळगाव, बेलवंडी, कोळगाव, लोणी व्यंकनाथ, मांडवगण व पिंपळगाव पिसा अशी सहा प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आली आहेत. शिवाय तालुक्यात 34 आरोग्य उपकेंद्रही कार्यरत आहेत. तालुक्यात आरोग्य विभागाकडे सध्या 178 कर्मचारीही सेवारत आहेत. तरीही तालुक्यातील आरोग्य सेवेची अवस्था अत्यंत शोचनीय अशीच आहे.


प्रिंट काढा