Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:24:30 hrs

मुख्य पान | आरोग्य आपल्यादारी योजनेतर्ंगत जिल्ह्यात 10 हजार रुग्णांची तपासणी
आरोग्य आपल्यादारी योजनेतर्ंगत जिल्ह्यात 10 हजार रुग्णांची तपासणी
धुळे, दि. 7 (प्रतिनिधी)- (08-January-2010)
Tags : Dhule,Regional
 

धुळे, दि. 7 (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत सुरु करण्यात आलेल्या आरोग्य आपल्या दारी योजनेतर्ंगत दहा हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात धुळे तालुक्यात दोन हजार 979 रुग्णांचा समावेश आहे. जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी आरोग्य विभागामार्फत आरोग्य आपल्या दारी या बाह्य सेवेची संकल्पना सुरु केली. दर बुधवारी ही संकल्पना राबविली जाते. प्रत्येक गावातील रुग्णाला प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा उपकेंद्रात जावून उपचार घेणे शक्य होत नाही. त्यामुळे सीईओ कुशवाह यांनी ही संकल्पना राबविली. या संकल्पनेमुळे रुग्णांना आता उपचार घेणे शक्य झाले आहे. दर बुधवारी प्रत्येक आरोग्य केंद्राचे व त्याअंतर्गत येणार्‍या उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी सर्व कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्राला संलग्न असलेल्या व पाच कि.मी. पेक्षा जास्त अंतर असलेल्या गावांमध्ये बाह्य रुग्ण सेंवेसाठी दिवसभर उपस्थित राहतात. जिल्ह्यंामध्ये 41 प्राथमिक आरोग्य केंद्र व 232 उपकेंद्र आहेत. दर बुधवारी 41 गावांमध्ये आरोग्य आपल्या दारी या संकल्पनेतून बाह्यरुग्ण सेंवा दिली जाते. पहिल्या बुधवारी 41 गावांमध्ये आरोग्य आपल्या दारी या संकल्पनेतून बाह्यरुग्ण सेवा दिली जाते. पहिल्या बुधवारी या सेवेचा लाभ जिल्हाभरातून 4000 रुग्णांनी तर दुसर्‍या बुधवारी 6000 रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यात धुळे तालुक्यातून पहिल्या बुधवारी 956 तर दुसर्‍या बुधवारी 2023 रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला. या योजनेअंतर्गत सुरु असलेल्या उपक्रमाला जिल्हा परिषदेचे कृषी सभापती प्रा. अरविंद जाधव, जिल्हा आरोग्य विस्तार अधिकारी डॉ. एस. एम. खान, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पी. एन. उपाध्याय, आरोग्य विस्तार अधिकारी पी. आर. जोशी यांनी बोरकुंड प्रा. आ. केंद्रांतर्गत रानमळा येथे व शिरुड प्रा. आ. केंद्रांतर्गत सौंदाणे येथे भेट दिली. या योजनेंअंतर्गत कोणत्याही प्रकारची फी रुग्णांकडून घेंतली जात नाही व सर्व प्रकारचे मोंफत औषधोपचार रुग्णांना दिला जातो. प्रा. अरविंद जाधव यांनी रुग्णांची चौकशी करुन त्यांच्या संवेंदना जाणून घेतल्या. यावेळी सौंदाणे येथील सरपंच नथ्थु पाटील व रानमळा येथील सरपंच कैलास मोरे, पदाधिकारी व जिल्हास्तरीय खातेप्रमुख, आरोग्य अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्ती, ग्रामसेवक आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.


प्रिंट काढा