पंचवटी,दि.21(वार्ताहर)- गंगाघाटावरील श्री साईबाबा मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्या- निमित्त उद्या रविवार (दि.22)पासून ते शुक्रवार दि.27 पर्यंत धामिर्र्क कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीसाईबाबा प्राणप्रतिष्ठा सोहळ्या- निमित्त आज सकाळी 10 वाजता श्रींची शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
प्राणप्रतिष्ठा सोहळा शुक्रवार दि.27 रोजी प.पू.सदगुरू विश्र्वात्मक ओम गुरुदेव जंगलीदास महाराज यांच्या हस्ते होणार आहे. तसेच यावेळी प.पू.श्री सदगुरू नारारणकाका ढेकणे महाराज उपस्थित राहणार असून सकाळी शांती सूक्त, स्थापित देवता पूजन, अभिषेक, तत्त्वन्यास, दुपारी उत्तरांग हवन, बलिदान, संतपूजन, दुपारी 12.15 (अभिजीत मुहूर्त)श्रीची प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण, प्रासादोत्सर्ग, यज्ञ पूर्णाहुती, श्रींची आरती-पुष्पांजली विश्र्वकल्याणार्थ प्रार्थना, ब्रह्मवृंद सन्मान, शुभाशीर्वाद, कर्म समर्पण आदी धार्मिक कार्यक्रम तसेच महाप्रसाद दुपारी श्री साईबाबा मंदिरात होईल. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री साई सेवा समिती विश्र्वस्त मंडळ, सरदार चौक मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
|