|
| मनसेच्या आमदारांतर्फे नांदगावकरांची दिलगिरी |
|
| Mumbai(12-November-2009) |
Tags : News,Regional,Political,National,Maharashtra |
मुंबई, दि. 11 (प्रतिनिधी) - समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना झालेल्या मारहाणप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चार आमदारांची शिक्षा कमी करावी अशी विनंती करत मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी बुधवारी विधानसभेत दिलगिरी व्यक्त केली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार नवीन आहेत. त्यांना सभागृहातील कामकाजाची फारशी माहिती नाही. संतापाच्या भरात त्यांच्याकडून मारहाणीचे कृत्य घडले. निलंबित सदस्य हे नवे असल्याने त्यांना ठोठावण्यात आलेली चार वर्ष निलंबनाची शिक्षा ही कठोर आहे. ही शिक्षा कमी करावी असे नांदगावकर यांनी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना केली. यापूर्वी अनेकदा गोंधळी आमदारांना सभागृहाने ठोठावलेली दीर्घकाळ निलंबनाची शिक्षा त्यांच्या दिलगिरी अथवा माफीनाम्यानंतर सभागृहाने फेरविचाराअंती घटविल्याची अनेक उदाहरणे घडली आहेत. त्यानुसार ही विनंती मनसेने केली आहे. |
प्रिंट काढा |
|
|
|