Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत नगरला 15 सुवर्णपदक   ‘स्टेन’गनपुढे धोनी धुरंधर ढेर   बॅण्ड कलाकारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा   वेश्यांच्या राड्याने नागरिक त्रस्त   पाच वर्षांत राष्ट्रीय समविकास योजनेचा निधी अखर्चित   ठाकूर पिंपळगावनजीक अपघातात तिघे गंभीर जखमी   ‘प्रयास’मुळे तरुणाईला सामाजिक दिशा मिळेल ः डॉ. पठारे   शहर बससाठी महामंडळाच्या हालचालींना वेग   जिल्हा परिषद अध्यक्षा विखे यांना राज्यस्तरीय सावित्री पुरस्कार   साक्षीदाराने आरोपींना ओळखले   केडगावचा पाणीपुरवठा विस्कळीत   मनपाकडून अशोका हॉटेल पुन्हा सील   पोटभाडेकरूंमुळे मनपाला 3 कोटींचा फटका   तंटामुक्त मोहिमेत श्रीगोंदा-पारनेर आघाडीवर   सरपंचाकडून खुनाची धमकी; वनक्षेत्रपालांचे निवेदन   प्राणाराम व ध्रानधारणा सर्व रोगांवरचे निःशुल्क औषध ः प्रा. निमसे   खांड प्रकल्पास निधी कमी पडू देणार नाही ः ना. पवार   Updated on February 9, 2010, 03:27:36 hrs

मुख्य पान | न्याय व्यवस्थेवरील विश्वास वाढला : हजारे
न्याय व्यवस्थेवरील विश्वास वाढला : हजारे
पारनेर, दि. 5 (प्रतिनिधी) (06-November-2009)
Tags : Ahmednagar,News
 

- सर्वोच्च न्यायालयाने खासदार पद्मसिंह पाटील यांचा जामीन नाकारल्याने जनतेचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास वाढला असून, खा.पाटील यांना आता निश्चित तुरुंगात जावे लागेल, असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केला. खा.पाटील यांनी आपल्या हत्येची सुपारी दिल्याची फिर्याद हजारे यांनी दिली होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पाटील यांना तात्पुरता जामीन दिला होता. या जामीनावर सुनावणी होऊन सर्वोच्च न्यायालयाने आज जामीन फेटाळला. यामुळे खा. पाटील यांना पुन्हा अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर हजारे राळेगणसिध्दी येथे पत्रकारांशी बोलत होते. न्यायमूर्ती सावंत आयोगामध्येच खा.पाटील यांच्याविरूद्ध तेरणा सहकारी साखर कारखाना, कारगिल घोटाळा, भूकंप घोटाळा अशा अनेक गुन्ह्यात आरोप सिध्द झाल्याने ते दोषी असल्याचे सिध्द झाले होते. आपल्या खुनाच्या सुपारी प्रकरणाबाबतच्या जामीन अर्जावर न्यायालयाने दिलेला निर्णय मान्य असून, यामुळे सर्वसामान्य जनतेचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास वाढला आहे.


प्रिंट काढा