|
|
|
|
| मुख्य पान | गार्डरूममध्ये जाणार्या कैद्यांची संख्या वाढली |
| गार्डरूममध्ये जाणार्या कैद्यांची संख्या वाढली |
|
| अहमदनगर, दि. 29 (प्रतिनिधी)-(30-October-2009) |
Tags : Ahmednagar,News |
जिल्हा रुग्णालयातील गार्डरूममध्ये राडा करणारे कैदी पुन्हा उपकारागृहातून (सबजेल) जिल्हा रुग्णालयात येऊ लागले आहेत. त्यामुळे जिल्हा कारागृह अधीक्षक आणि कारागृहातील डॉक्टरांकडून सर्वसामान्य कैद्यांवर अन्याय केला जात असल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे येथील जिल्हा रुग्णालयातील गार्डरूममध्ये दाखल केल जात असलेले कैदी हे खुनाच्या गुन्ह्यातील आहेत. त्यामुळे नेहमीच पोलिसांना चौकशीला सामोरे जावे लागत असल्याने उपकारागृहातील प्रक्रियेचीही चौकशी करावी अशी मागणी पोलिस दलातून होत आहे.
उपकारागृहात विविध गुन्ह्यांतील न्यायालयीन कोठडीचे कैदी असतात. ते आजारी पडल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे; परंतु कारागृहातील डॉक्टर आणि जिल्हा रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्या संगनमतामुळे ठाराविक कैद्यांनाच जिल्हा रुग्णालयातील गार्डरूममध्ये आजाराच्या नावाखाली दाखल करून घेतले जात आहे. दोन आठवड्यांपूर्वी खुनाच्या गुन्ह्यातील तब्बल 15 कैदी येथील जिल्हा रुग्णालयातील गार्डरूममध्ये दाखल करून घेण्यात आले होते. या त्यांना शाही वागणूक दिली जात असल्याने येथे दाखल होण्यासाठी कारागृहातील कैद्यांची चढाओढ चालू असते. मागील आठवड्यात जिल्हा रुग्णालयातील गार्डरूममध्ये कैद्यांनी हाणामारी केल्याने यातील एक कैद्याने जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात नियंत्रण कक्षाशी मोबाईलवरून संपर्क केल्यावर वरिष्ठ अधिकार्यांनी गार्डरूमची पाहणी केली होती. या बाबत ‘देशदूत’ने जिल्हा रुग्णालयातील गार्डरूममध्ये कैद्यांनी राडा घातल्याचे वृत प्रसिद्ध केले होते. त्याची चौकशी केल्यावर वरिष्ठ अधिकार्यांनी तातडीने गार्डरूममधून 11 कैद्यांना पुन्हा उपकारागृहात हलविले होते.
एक आठवडा झाल्यावर आता पुन्हा उपकारागृहातून जिल्हा रुग्णालयातील गार्डरूममध्ये खुनाच्या गुन्ह्यातील हेच कैदी आजारपणाच्या नावाखाली दाखल होऊ लागले आहते. रोज एकने संख्या वाढू लागली असून ते अगदी नियोजनबद्ध चालू असल्यचे दिसून येत आहे. कैद्यांनी राडा घातल्याची चौकशी चालू असताना पुन्हा उपकारागृहाच्या डॉक्टरमार्फत हेच कैदी जिल्हा रुग्णालयातील गार्डरूममध्ये कसे दाखल होत आहेत? असा प्रश्र्न विचारला जात असून उपकारागृहाच्या एकूण प्रक्रियेचीच चौकशी करण्यात यावी अशी मागणी पोलिस दलातून होत आहे. |
प्रिंट काढा |
|
|
|