Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत नगरला 15 सुवर्णपदक   ‘स्टेन’गनपुढे धोनी धुरंधर ढेर   बॅण्ड कलाकारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा   वेश्यांच्या राड्याने नागरिक त्रस्त   पाच वर्षांत राष्ट्रीय समविकास योजनेचा निधी अखर्चित   ठाकूर पिंपळगावनजीक अपघातात तिघे गंभीर जखमी   ‘प्रयास’मुळे तरुणाईला सामाजिक दिशा मिळेल ः डॉ. पठारे   शहर बससाठी महामंडळाच्या हालचालींना वेग   जिल्हा परिषद अध्यक्षा विखे यांना राज्यस्तरीय सावित्री पुरस्कार   साक्षीदाराने आरोपींना ओळखले   केडगावचा पाणीपुरवठा विस्कळीत   मनपाकडून अशोका हॉटेल पुन्हा सील   पोटभाडेकरूंमुळे मनपाला 3 कोटींचा फटका   तंटामुक्त मोहिमेत श्रीगोंदा-पारनेर आघाडीवर   सरपंचाकडून खुनाची धमकी; वनक्षेत्रपालांचे निवेदन   प्राणाराम व ध्रानधारणा सर्व रोगांवरचे निःशुल्क औषध ः प्रा. निमसे   खांड प्रकल्पास निधी कमी पडू देणार नाही ः ना. पवार   Updated on February 9, 2010, 03:29:13 hrs

मुख्य पान | ‘हिज्बुल’चे तीन दहशतवादी ठार
‘हिज्बुल’चे तीन दहशतवादी ठार
श्रीनगर, दि. 26 (वृत्तसंस्था) (27-October-2009)
Tags : Ahmednagar,Crime
 

- जम्मू-काश्मीरमधील शोपियॉं जिल्ह्यात आज पहाटे सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत हिज्बुल मुजाहिदीनचे तीन दहशतवादी ठार झाले. यात एका मोस्ट वॉंटेड दहशतवाद्याचा समावेश असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शाहीद मेहराज यांनी दिली. शोपियॉं जिल्ह्यातील शतधार-नासरपुरा भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार पोलिस आणि सुरक्षा दलाने आज पहाटे संयुक्त मोहीम हाती घेतली. दहशतवादी एका घरात लपून बसल्याचे लक्षात आल्यानंतर या संपूर्ण भागाला वेढा देण्यात आला. दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने घेरल्यामुळे त्यांनी गोळीबार करण्यास सुरवात केली. सहा तास चाललेल्या धुमश्चक्रीत हिज्बुल चे तीन दहशतवादी ठार झाले. चकमकीत ठार झालेला साकिब आणि त्याचा साथीदार पासवल हे दोघे गेले अनेक वर्षांपासून दहशतवादी कारवायांशी संबंधित होते. अनेक गुन्ह्यांमध्ये ते पोलिसांना हवे होते. चकमकीत ठार झालेल्या तिसर्‍या दहशतवाद्याची ओळख पटलेली नाही. पंतप्रधान उद्या काश्मीर दौर्‍यावर अनंतनाग आणि काझीगुंद यांना जोडणार्‍या लोहमार्गाचे उद्‌‌घाटन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान बुधवारी जम्मू काश्मीर दौर्‍यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवरच तीन दहशतवादी मारले गेल्याने कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात येत आहे.


प्रिंट काढा