Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:34:27 hrs

मुख्य पान | चौघा संशयितांना अटक; 80 हजारांचे सोने जप्त
चौघा संशयितांना अटक; 80 हजारांचे सोने जप्त
जळगाव,दि.25(प्रतिनिधी)- (26-October-2009)
Tags : Jalgaon
 

शहरातील गेंदालाल मिल परिसरात 80 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम अशा ऐवजासह चार संशयीतांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतल्याची घटना दि.24 रोजी रात्री उशीरा घडली. गेंदालाल मिल परिसरात आरोपी रमेश कैलास धनगर-पारधी, लखन रमेश धनगर पारधी, रवि कैलास धनगर व संतोष मानसिंग आदिवासी हे संशयीतरित्या फिरत असतांना पोलिस पथकास दिसुन आले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे सोन्याचे दागिने, सिटीझन कंपनीची एक घड्याळ व तेरा हजार रुपये रोख असा ऐवज संशयास्पदरित्या आढळुन आला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असुन अधिक तपास सुरु आहे. ही कारवाई पोलिस अधिक्षक संतोष रस्तोगी व अप्पर पोलिस अधिक्षक धनंजय कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.पातोंड, ए.एस.आय.गिरधर निकम, सुभाष मिस्त्री, अनिल घुले, बशिर शेख, अनिल इंगळे , मिनल साकळीकर, चालक सुरेश पवार यांच्या पथकाने केली.


प्रिंट काढा