Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:23:49 hrs

मुख्य पान | रेल्वे अपघातात 22 ठार; 20 जखमी
रेल्वे अपघातात 22 ठार; 20 जखमी
मथुरा, दि.21 (वृत्तसंस्था) (22-October-2009)
Tags : Ahmednagar,Crime
 

- उत्तर प्रदेशातील मथुरा रेल्वे स्थानकाजवळ आज (ता.21) पहाटे मेवाड एक्सप्रेसला पाठीमागून येणार्‍या संपर्क क्रांती गोवा एक्सप्रेसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात 22 जण ठार व 20 जण जखमी झाले आहेत. केंद्रीय रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये व जखमींना एक लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. तसेच रेल्वे प्रशासनाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, हा अपघात सिग्नल तोडल्याने झाला नसून, गाडी थांबविण्यासाठी पोलिसांनी चेन ओढल्याने झाला असल्याचा खुलासा रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. तसेच, मथुरा स्थानकाजवळ मेवाड एक्सप्रेसमधील प्रवाशाने चेन ओढल्याने रेल्वे थांबली आणि त्याच वेळेस रुळावरून पाठीमागून येणार्‍या गोवा एक्सप्रेसचे इंजिन मेवाड एक्सप्रेसच्या जनरल बोगीला धडकले. अशाप्रकारे हा दुर्दैवी अपघात घडल्याचे रेल्वे अधिकार्‍यांकडून सांगण्यात येत आहे.


प्रिंट काढा