Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:23:55 hrs

मुख्य पान | राष्ट्रीय | मुख्यमंत्री कॉंग्रेसचाच - पवार
मुख्यमंत्री कॉंग्रेसचाच - पवार
नवी दिल्ली, दि.21 (वृत्तसंस्था)(22-October-2009)
Tags : Ahmednagar,Political,National
 

- पक्षातून होत असलेली मुख्यमंत्रिपदाची मागणी फेटाळून लावत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कॉंग्रेसचाच मुख्यमंत्री असेल असे आज (ता. 21) पुन्हा एकदा स्पष्ट केले. राष्ट्रवादीपेक्षा कॉंग्रेसने जास्त जागा लढविल्याने आम्ही या पदावर हक्क सांगू शकत नसल्याचे, पवार यांनी येथे सांगितले. विधानसभा निवडणूक निकालाच्या एक दिवस अगोदर त्यांनी केलेल्या या विधानामुळे मुख्यमंत्रिपदाबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. पवार म्हणाले, की कॉंग्रेसपेक्षा जास्त जागा मिळविण्यात आम्हाला यश आल्यानंतरच राष्ट्रवादी या पदावर आपला हक्क सांगू शकते. या निवडणुकीत राष्ट्रवादीला 112 जागांवर लढावे लागले होते. तर कॉंग्रेसने.170 जागा लढविल्याने निश्चितच त्यांना आमच्यापेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. निवडणूक निकालाच्या चाचण्यांविषयी विचारले असता ते म्हणाले, की माझा या चाचण्यांवर विश्वास नाही.


प्रिंट काढा