|
| पाकमध्ये आत्मघाती हल्ले, 43 ठार |
|
| लाहोेर (वृत्तसंस्था)- (16-October-2009) |
Tags : Sarvamat,International |
लाहोेर (वृत्तसंस्था)- पाकिस्तानमध्ये रावळपिंडी येथील सैन्य मुख्यालयावरील हल्ल्यास दोन-तीन दिवसही उलटले नाहीत तोच पुन्हा एकदा आत्मघाती हल्ले झाले असून लाहोर, कोहाट व रावळपिंडी या तीन शहरात घडविण्यात आलेल्या 5 बॉम्बस्फोटात 43 जण ठार झाले आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत.
पाकिस्तानच्या लाहोर शहरातील फेडरल इन्व्हेस्टीगेशन एजन्सीच्या (एफआयए) इमारतीत काही आत्मघाती हल्लेखोरांनी घुसून तेथील काही जणांना ओलीस ठेवले आहे. यात आतापर्यंत 11 जण ठार झाले असून सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत एका दहशतवाद्यास अटक करण्यात आली आहे.
एफआयएच्या इमारतीत गोळीबार सुरू असून ‘डॉन न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार चार अधिकार्यांसह 10 जण या हल्ल्यात ठार झाले आहेत तर दुसर्या एका घटनेत लाहोरच्याच एका पोलीस ट्रेनिंग सेंटरवरही दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला आहे तर तेथून जवळच असलेल्या पोलीस स्टेशनवरही बॉम्बस्फोट करण्यात आला आहे.
दरम्यान पाकिस्तानच्या वाव्यय सरहद्द कोहाट शहरातही एका पोलीस स्टेशनसमोर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 10 जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये शाळकरी मुलांची संख्याही अधिक आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कारने आलेल्या एका हल्लेखोराने स्वत:ला बॉम्बने उडवून घेतले.
तहरिक-ए- तालिबान या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या खुल्या हल्ल्यात प्रथमच दहशतवाद्यांनी महिला दहशतवाद्यांचा समावेश केला असून या हल्ल्यात तीन महिला दहशतवाद्यांचाही समावेश आहे. तिन्ही महिला 17 ते 25 वर्ष वयोगटातील आहेत.
या हल्ल्यात 43 जण ठार झाले असून त्यात 7 पोलीस जवानांचा समावेश आहे. दहशतवादी एफआयए बिल्डींगमध्ये घुसले व तेथे जोरदार गोळीबार केला. चार दहशतवाद्यांनी दोन अधिकार्यांना ओलीस ठेवले असून दोघा जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लाहोरमध्ये पोलिसांच्या गणवेशात दहशतवाद्यांनी गुप्तचर संस्था एफआयए भवन, मनावा पोलीस प्रशिक्षण केंद्र आणि विशेष सुरक्षा दल ‘एलिट’ मुख्यालयावर एकाचवेळी हल्ला (पान 2 वर) |
प्रिंट काढा |
|
|
|