Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत नगरला 15 सुवर्णपदक   ‘स्टेन’गनपुढे धोनी धुरंधर ढेर   बॅण्ड कलाकारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा   वेश्यांच्या राड्याने नागरिक त्रस्त   पाच वर्षांत राष्ट्रीय समविकास योजनेचा निधी अखर्चित   ठाकूर पिंपळगावनजीक अपघातात तिघे गंभीर जखमी   ‘प्रयास’मुळे तरुणाईला सामाजिक दिशा मिळेल ः डॉ. पठारे   शहर बससाठी महामंडळाच्या हालचालींना वेग   जिल्हा परिषद अध्यक्षा विखे यांना राज्यस्तरीय सावित्री पुरस्कार   साक्षीदाराने आरोपींना ओळखले   केडगावचा पाणीपुरवठा विस्कळीत   मनपाकडून अशोका हॉटेल पुन्हा सील   पोटभाडेकरूंमुळे मनपाला 3 कोटींचा फटका   तंटामुक्त मोहिमेत श्रीगोंदा-पारनेर आघाडीवर   सरपंचाकडून खुनाची धमकी; वनक्षेत्रपालांचे निवेदन   प्राणाराम व ध्रानधारणा सर्व रोगांवरचे निःशुल्क औषध ः प्रा. निमसे   खांड प्रकल्पास निधी कमी पडू देणार नाही ः ना. पवार   Updated on February 9, 2010, 03:28:57 hrs

मुख्य पान | दिवाळीत बिग बजेट चित्रपटांचा धमाका
दिवाळीत बिग बजेट चित्रपटांचा धमाका
मुंबई (वृत्तसंस्था)- (16-October-2009)
Tags : Sarvamat,News
 

मुंबई (वृत्तसंस्था)- दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर बिग बजेट चित्रपट रिलीज करण्याची आपली परंपरा यंदाही बॉलिवूडने कायम राखली आहे. येत्या आठवड्यात अक्षयकुमार आणि लारा दत्ताचा ‘ब्ल्यू’, अजय देवगणचा ‘ऑल द बेस्ट’ आणि युटीव्हीचा ‘मैं और मिसेस खन्ना’ एकाच दिवशी रिलीज होताहेत. ‘ब्ल्यू’च्या निर्मितीवर 120 कोटी रूपये तर ‘ऑल द बेस्ट’वर 70 कोटी रूपये आणि ‘मैं और मिसेस खन्ना’वर 40 कोटी रूपये खर्च करण्यात आलेत. एकाचवेळी हे तिन्ही चित्रपट रिलीज होणार असल्याने तब्बल 230 कोटी रूपयांच्या गुंतवणुकीचे भवितव्य पणाला लागणार आहे. दिवाळीत सणासुदीचा आनंद लुटण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणावर चित्रपट पाहायला बाहेर पडतात. त्यामुळेच अनेक निर्माते या काळात चित्रपट रिलीज करण्यावर भर देतात. यशराज फिल्म्स आणि करण जोहर यांच्या अनेक चित्रपटांनी दिवाळीच्या काळातच बॉक्सऑफिसवर कोट्यवधी रूपयांचा व्यवसाय केला आहे. शाहरूख खानची कारकीर्द दिपोत्सवाच्या काळातच उजळली. दिवाळीच्या काळात रिलीज झालेल्या शाहरूख खानच्या चित्रपटांनी इतिहास घडवलाय. बारा वर्षापूर्वी 1997 साली रिलीज झालेला ‘दिल तो पागल है’ या चित्रपटाने तडाखेबंद व्यवसाय केला होता. त्याच्या पुढच्या वर्षी 1998 साली करण जोहरच्या ‘कुछ कुछ होता है’ ने देखील बॉक्सऑफिसवर विक्रमी व्यवसाय केला. या चित्रपटाने अमिताभ बच्चन आणि गोविंदाच्या ‘बडे मिया’ ला देखील झाकोळून टाकले होते. त्यानंतर 2000 साली आलेल्या शाहरूख खानच्या ‘मोहब्बते’, 2004 सालच्या ‘वीरझारा’, 2006 ‘डॉन’ आणि 2007 सालच्या ‘ओम शांती ओम’ने देखील बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला. डॉनच्या समोर अक्षयकुमार, प्रिती झिंटाच्या ‘जानेमन’ आणि ‘ओम शांती ओम’ च्या समोर संजय लिला भन्साळीच्या ‘सॉंवरिया’ने आपटी खाल्ली होती. दिवाळी केवळ शाहरूख खानसाठीच लाभदायक ठरली, असे नाही तर आमीर खानलाही सुपरस्टारडमपदी पोहचवले. आमीर खानचा ‘राजा हिंदुस्थानी’ दिवाळीतच रिलीज झाला होता. राजा हिंदुस्थानी समोर सनी देवलचा घातकही फिका पडला होता. यंदाच्या दिवाळीत होणारे बिग बजेट चित्रपट यशस्वी होतात किंवा नाही यावर खर तर इंडस्ट्रीचे भवितव्य अवलंबून आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. काही महिन्यांपूर्वी निर्माते आणि मल्टीप्लेक्स कंपन्यांमधील वादात बॉलिवूडला 300 कोटी रूपयांचा फटका बसला होता. तसेच यंदा रिलीज झालेल्या चित्रपटांपैकी फक्त पाच ते सहा चित्रपट हिट झालेत. त्यात प्रामुख्याने राझ, देव, डी, न्यूयॉर्क, लव आज कल आणि कमिने यांचा समावेश आहे. सलमान खानच्या ‘वॉंटेड’ने तीन आठवड्यात 57 कोटी रूपयांचा व्यवसाय केला तर ‘वेक अप सिद’ आणि ‘डू नॉट डिर्स्टब’ या दोन्ही चित्रपटांचे पहिल्या आठवड्यातील कलेक्शन आहे. साधारणत: 14 ते 16 कोटी रुपये इतके आहे. आता येत्या आठवड्याच्या अखेरीस प्रेक्षक अक्षयकुमारच्या ‘ब्ल्यू’, अजय देवगणच्या ‘ऑल द बेस्ट’ आणि सलमान खानच्या ‘मै और मिसेस खन्ना’ यापैकी कोणाला पसंती देतात ते पाहयचं.


प्रिंट काढा