Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:46:56 hrs

मुख्य पान | राष्ट्रीय | माहिती अधिकार कायद्यासाठी ‘ई-गव्हर्नन्स’ला मंजुरी
माहिती अधिकार कायद्यासाठी ‘ई-गव्हर्नन्स’ला मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- (14-October-2009)
Tags : Sarvamat,National
 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- माहिती अधिकार कायदा आणखी प्रभावशाली करण्यासाठी ‘ई-गव्हर्नन्स’ आणि ‘ई-मेल’च्या माध्यमातून संवाद सेवा प्रारंभ करण्यास केंद्र सरकारने सैद्धांतिक मंजुरी दिल्याची माहिती निवृत्ती वेतन व लोकतक्रार आणि पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजधानीत दिली. माहिती अधिकार कायद्यास अधिक प्रभावशाली करण्यासाठी गेल्या वर्षी केंद्र सरकारकडे प्रायोजित योजना सादर केली होती. याअंतर्गत माहिती अधिकाराचे प्रत्त्युतर केंद्र उभारण्याच्या कार्यासही प्रारंभ झाला होेता. केवळ या प्रयत्नांवर न थांबता माहिती अधिकार कायद्यात ‘ई-मेल’च्या माध्यमातून संवाद सेवेस केंद्राने सैद्धांतिक मंजुरी दिली आहे, अशी माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. माहिती अधिकार कायद्यास आणखी प्रभावी करण्यासाठी पहिल्या चार वर्षात माहिती मागणार्‍यांनी, प्रदान करणार्‍यांनी स्वयंसेवी संस्था, नागरी संघटना आणि प्रसारमाध्यमांनी भरघोस प्रतिसाद दिला, असे चव्हाण यांनी माहिती अधिकार कायद्याच्या चौथ्या वार्षिक संमेलनातील भाषणादरम्यान सांगितले. अधिक पारदर्शकतेने काम करण्याची प्रेरणा या कायद्यामुळे मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. या कायद्याचा वापर करणार्‍यांसाठी हा कायदा अधिक सुलभ करण्याची सरकारची इच्छा आहे. या दिशेने प्रयत्न करण्यासाठी माहिती आयोग, माहिती आयुक्त आणि नागरी संघटनांशी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.


प्रिंट काढा