चीनसोबतच्या संबंधात अडथळा येऊ नये, म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी तिबेटी नेते दलाई लामा यांच्याशी होणारी भेट लांबणीवर टाकली आहे. पुढील महिन्यात चीनचे प्रमुख हू जिंताओ यांची ओबामा भेट घेणार आहे. त्यापूर्वी चीनशी काही वाद होऊ नये, अशी अमेरिकेची इच्छा लामांची भेट लांबणीवर टाकण्यामागे स्पष्ट दिसते आहे.