Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत नगरला 15 सुवर्णपदक   ‘स्टेन’गनपुढे धोनी धुरंधर ढेर   बॅण्ड कलाकारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा   वेश्यांच्या राड्याने नागरिक त्रस्त   पाच वर्षांत राष्ट्रीय समविकास योजनेचा निधी अखर्चित   ठाकूर पिंपळगावनजीक अपघातात तिघे गंभीर जखमी   ‘प्रयास’मुळे तरुणाईला सामाजिक दिशा मिळेल ः डॉ. पठारे   शहर बससाठी महामंडळाच्या हालचालींना वेग   जिल्हा परिषद अध्यक्षा विखे यांना राज्यस्तरीय सावित्री पुरस्कार   साक्षीदाराने आरोपींना ओळखले   केडगावचा पाणीपुरवठा विस्कळीत   मनपाकडून अशोका हॉटेल पुन्हा सील   पोटभाडेकरूंमुळे मनपाला 3 कोटींचा फटका   तंटामुक्त मोहिमेत श्रीगोंदा-पारनेर आघाडीवर   सरपंचाकडून खुनाची धमकी; वनक्षेत्रपालांचे निवेदन   प्राणाराम व ध्रानधारणा सर्व रोगांवरचे निःशुल्क औषध ः प्रा. निमसे   खांड प्रकल्पास निधी कमी पडू देणार नाही ः ना. पवार   Updated on February 9, 2010, 03:27:04 hrs

मुख्य पान | राजकीय | राज म्हणजे बेडूक : मुख्यमंत्री चव्हाण
राज म्हणजे बेडूक : मुख्यमंत्री चव्हाण
Mumbai(06-October-2009)
Tags : News,Political,National,Maharashtra
 

मुंबई, (वृत्तसंस्था) - मतांसाठी प्रचाराचा जोर वाढला आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरवात झाली आहे. आपणही बुलटेनची सुरवात करुया अशाच राजकीय आरोपांच्या बातमीने राज ठाकरे म्हणजे पावसाळी बेडूक आहे अशी टीका मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. नांदेडमध्ये पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.नांदेड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी विविध प्रश्नांना मोकळेपणाने उत्तर दिली. त्यावेळी राज ठाकरे यांच्यासंदर्भात विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी राज यांच्या आरोपांचा आणि त्यांच्या भाषण शैलीचा समाचार घेतला. राज यांचे थेट नाव घेणार्‍या मुख्यमंत्र्यांनी आपल्या अन्य विरोधकांची नावे उघडपणे घेणे टाळत राज आणि विरोधक असे म्हणत विरोधकांवर टीका केली. मागील काही दिवसांपासून राज ठाकरे मराठीचा मुद्दा पुढे करत आहेत. मराठीप्रेम व्यक्त करतानाच ते सेना-भाजप युती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांना मराठी माणसाची गळचेपी केली म्हणून धारेवर धरत आहेत. राज्यातील अनेक प्रस्थापित बड्या नेत्यांवर टीका करताना आरोपांची राळ उठवत आहेत. या पार्श्र्वभूमीवर राज यांच्या वक्त्यव्याबाबत मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारताच मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे आणि सगळ्या विरोधकांना पावसाळी बेडूक म्हणत त्यांना फार किंमत देत नसल्याचेच संकेत दिले.


प्रिंट काढा