जोहान्सबर्ग (वृत्तसंस्था) जेसी रायडर (74) आणि मार्टिन गुप्टिल (66) यांच्या जोरदार खेळीनंतर कायले मिल्सच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने श्रीलंकेला पराभूत करुन चॅम्पियन्स चषकाच्या उपांत्यफेरीत जाण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. न्यूझीलंडने श्रीलंकेचा 38 धावांनी पराभव केला.
न्यूझीलंडने ठेवलेले 315 धावांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी मैदानात उतरलेला श्रीलंकेचा संघ पूर्ण 50 षटकेही खेळू शकला नाही. 46.4 षटकात 277 धावांतच लंकेचा संघ तंबूत परतला. या विजयाने न्यूझीलंडच्या उपांत्यफेरीत जाण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत, तर श्रीलंकेच्या संघाने मात्र घरचा रस्ता धरण्याचे निश्चित केले आहे.
|