logo
Updated on Nov 23, 2014, 17:19:12 hrs

नाशिक

मुख्य पान | हक्काच्या घरासाठी सीटुचा मोर्चा जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
नाशिक
हक्काच्या घरासाठी सीटुचा मोर्चा जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
Nashik,CoverStory
बेघर व भाडेकरू व गरजु नागरीकांसाठी अल्प उत्पन्न गट व मध्यम उत्पन्न गटासाठी घर बांधणी योजना राबवुन माफक दरात घरे उपलब्ध करून देण्यात यावी या मागणीसाठी आज सिटु संलग्न भारतीय ट्रेड युनियनच्यावतीने शहरातुन मार्चा काढण्यात आला. केंद्र व राज्य शासन सातत्याने जागतीकीकरण, खाजगीकरण व उदारीकरण या त्रिसुत्रीवर आधारलेल्या धोरणांचा अवलंब करीत आहे. दिवसेंदिवस जमीन, पोलाद, सिमेंट , वाहतुक खर्च इत्यादी किंमती वाढत असल्याने घरांच्या किंमती नागरीकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे नागरीकांना घर घेणे परवडणारे नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांना परवडेल अशा माफक दरात घर उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे या मागणीसाठी हा मार्चा काढण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. केंद्र राज्य शासन, म्हाडा सिडको व मनपामार्फत विविध उत्पन्न गटातील स्वतःचे घर नसलेल्या नागरीकांसाठी २५ हजार घर बांधणी योजना ताबडतोब सुरू करावी, झोपडपटटीवासीयांना त्यांच्या राहत्या ठिकाणीच घरे बांधुन द्यावीत, जवाहरलाल नेहरू योजनेअंतर्गत बांधण्यात आलेली २५ टक्के घरे असंघटीत कामगार, घरेलु कामगार, कंत्राटी कामगार व बंद कंपन्यांतील कामगारांना देण्यात यावी, घर बांधणी योजनेसाठी सरकारी मालकीच्या जमीनी उपलब्ध करून द्याव्यात,अशा विविध मागण्या यावेळी मोर्चाव्दारे करण्यात आल्या. या मोर्चात डॉ. डी.एल.कराड, ऍड.वसुधा कराउ, सिंताराम ठोंबरे, किसन गुजर, कल्पना शिंदे, ऍड.तानाजी जायभावे, अशोक लहाने, आदिंसह नागरीक सहभागी झाले होते.

Print
 
ebooks
notices
आजचा प्रश्न
Q1. नाशिक तालुक्यातील पूर्ण भागात पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊनही सद्यस्थितीत
register
sdsad
right_banner
For additional technical assistance
+91 9881748131 ( Tushar Gavande )