देशदूततर्फे आयोजित व दर्जी फाऊंडेशनतर्फे नामांकीत ‘देशदूत रतनलाल बाफना युवा पुरस्कार २०१३’ योजनेत उद्या (दि.८) कृषी (कोरडवाहू) या गटाचा प्रवेश अर्ज प्रसिद्ध झाला आहे.
ही योजना १९ गटांमधून घेतली जाणार आहे. योजनेचे नियम व अटी दि.७ मार्च २०१३ च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या आहेत.
ही योजना केवळ युवकांसाठी आहे यात केवळ २१ ते ३८ वयोगटातील युवकच सहभागी होवू शकतील.
कृषी (कोरडवाहू) गटातून युवक शेतकर्यांनी प्रवेश अर्ज भरावेत. जळगाव जिल्ह्यात कोरडवाहू शेतीचे क्षेत्र ७० टक्के आहे. केवळ पावसाच्या पाण्यावर खरीप हंगाम काढण्याचा आणि पाटाच्या पाण्यावर कधी-कधी उन्हाळी हंगाम घेणार्या युवक शेतकर्यांनी यासाठी प्रवेश अर्ज भरावेत.
कमी पाण्यातील शेती, कमी शेतजमिनीत जास्त उत्पादन, आंतर पीक, जोड-पीक, बांधावरची शेती, अपांरपारीक पिकांचे उत्पन्न, (उदा. निंबू, सीताफळ, चिकूचे उत्पन्न) असे प्रयोग करणार्या युवक शेतकर्यांनी या गटात प्रवेश अर्ज भरावेत. यांत्रिक शेतीचा प्रयोग करणार्यांना ही संधी आहे.
शेतीत आपले काम इतरांपेक्षा चांगले असेल तर निश्चित प्रवेश अर्ज भरावा. काही शंका असल्यास मोबाईलवर संपर्क साधावा. (उद्याच्या अंकात ः कृषी (बागायत) गटाचा प्रवेश अर्ज) अर्ज पान १४ वर |