|
|
|
|
| मुख्य पान | शहाद्यात पोलीस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्त्या |
| शहाद्यात पोलीस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्त्या |
|
| शहादा, दि.७ (ता.प्र.) - (13-May-2013) |
Tags : Dhule,Nandurbar |
येथे पोलीस नाईकाने आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. चाळीसगाव तालुक्यातील रहिवासी व शहादा पोलीस ठाण्यात पोलीस नायक म्हणून कार्यरत असलेले संजय माधवराव माळी (वय ४०) हे आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास मॉर्निंग वॉकला जातो असे सांगून घराबाहेर पडले. त्यांनी दोंडाईचा रोडवरील पोलीस उपविभागीय कार्यालयाच्या आवारातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी असा परिवार आहे.
|
प्रिंट काढा |
|
|
|