|
| अखेर महिंद्राचा संप मिटला |
|
| nashik(13-May-2013) |
Tags : Nashik,mahindra, strike |
सातपूर । दि. 7 प्रतिनिधी- महिंद्रा एम्प्लॉईज युनियनने सोमवारपासून पुकारलेल्या काम बंद आंदोलनानंतर काल कामगार उपायुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीत या प्रश्नावर पडदा टाकण्यात आला. व्यवस्थापन व एम्प्लॉईज युनियनच्या पदाधिकार्यांनी संयुक्तीक तोडगा मान्य करत हा वाद मिटवला.
महिंद्रा कंपनीतील वेतनवाढ करार 5 फेब्रुवारी रोजी संपला होता. तो करार तातडीने करावा या मागणीसाठी युनियच्या पदाधिकार्यांनी उपोषणाचे शस्त्र उगारले होते. दरम्यान ईपीपी कामगारांना काम करण्यास मनाई केल्याने चार तास उत्पादन रखडल्याने प्रवीण शिंदे व अमोल सोनवणे यांच्यावर चौकशी निलंबनाची कारवाई झाली. परिणामी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले.
या पार्श्वभूमीवर काल कामगार उपायुक्तांच्या दालनात व्यवस्थापनाने निलंबन कारवाई मागे घेतली व कामगारांनी संप व आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली. मात्र, युनियनने घेतलेल्या निर्णयाला विरोध दर्शवत काही कामगारांनी आंदोलन चालू ठेवण्याची मागणी केली. यावेळी डॉ. कराड यांच्या मध्यस्थीने पदाधिकार्यांनी घेतलेल्या निर्णयावर त्यांचे मन वळवण्यात यश आले.
|
प्रिंट काढा |
|
|
|