इंदिरानगर । दि. 7 वार्ताहर- प्रभाग 53 मध्ये आकांक्षा सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक महिलादिनाच्या पूर्वसंध्येचे औचित्य साधून दोन महिन्यापूर्वी सुरू केलेल्या प्रौढ महिला साक्षरता अभियानांतर्ंगत ज्या महिला साक्षर झाल्या अशा 10 महिलांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.आशालता देऊळकर, स्मिता महाबळ, नगरसेविका अर्चना जाधव व्यासपीठावर उपस्थित होत्या. संस्थेच्या वतीने राजीवनगर वसाहतीतील सुमारे 28 महिला मोलमजुरी करून आपल्या संसाराला हातभार लावत होते. परंतु साक्षर नसल्याने नगरसेविका अर्चना जाधव व संजय जाधव यांनी संस्थेच्या वतीने हा कार्यक्रम राबविला. यामध्ये चंद्रकला लोखंडे, कलिंदा आभोरे, मीना भदांगे, छाया पंडागळे, रंजना नरगाळे, सुरेखा तुपसुंदर, शारदा मलासार या महिलांना दोन महिन्यात लिहायला वाचायला शिकल्यामुळे त्यांचा संस्थेच्या वतीने नारळ व खण देऊन सत्कार करण्यात आला.
सदर महिलांना शीतल जाधव यांनी साक्षर बनविण्यास मदत केली. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सपना भालेराव यांनी केले तर आभार अर्चना जाधव यांनी मानले.
|