Marathi News Paper
 अकरा दिवसात सहा खून   कांदा व्यापार्‍याकडे मागितली 5 कोटींची खंडणी   Updated on May 21, 2013, 18:06:00 hrs




Fro additional techical assistance

+91 9889748131
+91 9371252322
मुख्य पान | वसुलीसाठी जप्ती मोहीम
वसुलीसाठी जप्ती मोहीम
nashik(13-May-2013)
Tags : Nashik,collection, forfeiture
 

नवीन नाशिक । दि. 7 प्रतिनिधी- मार्च महिना सुरू झाल्याने मार्च अखेरपर्यंतचे वसुलीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून महानगरपालिका नवीन नाशिक विभागाच्या वतीने सध्या वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत थकबाकी न भरणार्‍यांच्या मिळकती जप्त करण्याची कारवाईसुद्धा सुरु करण्यात आली असल्याचे विभागीय अधिकारी ए.पी. वाघ यांनी सांगितले. मनपाच्या नवीन नाशिक विभागीय कार्यालयाला घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीचे मार्चअखेरपर्यंत उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यात घरपट्टीचे 15 कोटी 50 लाख तर पाणीपट्टीचे 14 कोटीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी घरपट्टी 10 कोटी 50 लाख व पाणीपट्टीचे 6 कोटी 50 लाख इतकी रक्कम वसूल झाली आहे. घरपट्टी व पाणीपट्टीच्या 29 कोटी 50 लाख उद्दिष्टापैकी आजपर्यंत दोन्ही मिळून 17 कोटी वसुली झाली आहे. अजूनही मार्च अखेरपर्यंत सुमारे 12 कोटी 50 लाख वसुली करावयाची आहे. घरपट्टी व पाणीपट्टी वसूल करतांना थकबाकी न भरणार्‍यांवर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आत्तापर्यंत 675 नळधारकांचे नळ कने्नशन बंद करण्यात आले असून तेरा मिळकती जप्त करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर साडेतीनशेहून अधिकाना जप्तीचे वॉरंट बजाविण्यात आले आहे. पाणीपट्टी थकबाकी न भरणार्‍या सुमारे तीन हजार थकबाकीदारांना नोटिसा बजाविण्यात आल्या असून, थकबाकीपोटी 672 नळजोडणी बंद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पाणी बचतीसाठीही प्रयत्न नवीन नाशिक परिसरात होणारा पाण्याचा अपव्यय विचारात घेऊन प्रशासनाने नळांना तोट्या नसणे, विद्युत मोटारींचा वापर करणे अशांविरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईत आत्तापर्यंत या कारवाईत 43 मोटार जप्ती करण्यात आली असून सुमारे 32,500 दंड वसूल करण्यात आला आहे. मात्र या मोहिमेला पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.


प्रिंट काढा