|
|
|
|
| मुख्य पान | आठ टक्के विकासदर गाठण्यात यश येईल : मॉण्टेक |
| आठ टक्के विकासदर गाठण्यात यश येईल : मॉण्टेक |
|
| लंडन, दि. ७ (प्रतिनिधी) -(13-May-2013) |
Tags : International,Development Index,Recession,Montek Singh
Ahluwalia,London |
लंडन, दि. ७ (प्रतिनिधी) - जागतिक मंदीच्या विळख्यात असलेली भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा एकदा आठ टक्के विकासदर गाठण्यात यशस्वी होईल, असा विश्वास नियोजन आयोगाचे अध्यक्ष मॉन्टेकसिंग अहलुवालिया यांनी व्यक्त केला. वाढती आर्थिक तूट ही सध्या देशासमोरील सगळ्यात मोठी समस्या असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या दहा वर्षांत भारताचा आर्थिक विकासदर ७.५ टक्क्यांवर होता. मात्र या दशकभरात भारतीय अर्थव्यवस्था खालावली आहे. त्यामुळे आर्थिक तूट कमी करुन अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी प्रयत्न केले जातील. पुढील २०१३-१४ या आर्थिक वर्षांत ६.५ टक्के विकासदर गाठण्याचे लक्ष्य आहे. आठ टक्के विकासदर गाठण्यासाठी भारताची क्षमता असल्याचे अहलुवालिया यांनी सांगितले. मॉन्टेकसिंग अहलुवालिया यांनी लंडन येथील ऑक्सफर्ड विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. भारताचा विकासदर हा सध्या पाच टक्क्यांवर आहे. मात्र जागतिक मंदीचा परिणाम संपूर्ण जगावर झाला आहे. त्यामुळे भारतीय विकासदरावरही त्याचा परिणाम झाला आहे. विकासदर गाठणे हे महत्वाचे आहे पण त्याचबरोबर तो कायम राखणे हे त्याही पेक्षा मोठे आव्हान आहे. आर्थिक विकासदर कसा गाठायचा याची सरकारला कल्पना आहे. पण देशातील विषम अर्थव्यवस्थेचा परिणामही विकास दरावर होतो. गरिब लोकं अधिक गरिब आणि श्रीमंत हे अधिक श्रीमंत होत आहेत. त्यामुळे ही दरी कमी करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत, असेही मॉण्टेक म्हणाले. परकीय गुंतवणुकदारांना आकर्षिक करण्यासाठी भारताने खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आहे. भारताकडे मुबलक प्रमाणात मनुष्यबळ आहे. या मनुष्यबळाचा खासगी क्षेत्रात वापर करता येऊ शकतो. पण सध्या चालू खात्यातील आर्थिक तूट ही सरकारची डोकेदुखी ठरत आहे. पण जागतिकस्तरावरील गुंतवणूकदारांना आकर्षिक करण्यासाठी भारताकडे अनेक क्लृप्त्या आहेत, असेही मॉण्टेकसिंग यांनी सांगितले.
|
प्रिंट काढा |
|
|
|