|
| अवजड वाहनांमुळे रस्त्याचे नुकसान |
|
| nashik(13-May-2013) |
Tags : Nashik,heavy, bad roads |
नाशिक । दि.7 प्रतिनिधी- इगतपुरी आणि सिन्नर तालु्नयाच्या काही भागात सुझलॉन कंपनीच्या सुरू असलेल्या पवन च्न्नयांचे काम आणि त्या अनुषंगाने अवजड वाहनांची सतत होणारी वाहतूक यामुळे जिल्हा परिषद तसेच सार्वजिनक बांधकाम विभागाच्या रस्त्यांचे नुकसान होत असल्याची तक्रार जिल्हा परिषद सदस्या सुजाता वाजे यांनी केली.
याबाबत जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले आहे. तीन वर्षापूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने याच कारणावरून रास्ता रोकोसारखी आंदोलने केली होती. या आंदोलनांची दखल घेऊन एक किलोमीटरसाठी दहा लाख रुपये याप्रमाणे नुकसानभरपाई देण्याचे आदेश सरकारी पातळीवरून देण्यात आले होते. ही भरपाई संबंधित कंपनीकडून अद्यापही मिळाली नसल्याची बाब जिल्हाधिकार्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. अजूनही टाकेद, धामणगाव, अडसरे, धानोशी या गावांमधून अवजड वाहनांची वाहतूक सुरूच असून नुकसानभरपाई न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही वाजे यांनी दिला आहे.
|
प्रिंट काढा |
|
|
|