जुने नाशिक । दि. 7 वार्ताहर- महाराष्ट्र सांस्कृतिक ज्ञानपीठतर्फे जागतिक महिलादिनानिमित्त जिल्ह्यातील विविध क्षेत्रात भरारी घेणार्या 21 महिलांचा सत्कार आज करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अजित बागमार होते.
आज सायंकाळी शहरातील प. सा. नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक संस्थेच्या दुर्गा सुधीर तांबे, ज्येष्ठ समाजसेवक बिरदीचंद नहार, विजय कासलीवाल, अशोक बागमार आदी उपस्थित होते. सत्कार करण्यात आलेल्यांमध्ये आ. निर्मलाताई गावित, माजी मंत्री डॉ. शोभाताई बच्छाव (नेतृत्व), भुजबळ नॉलेज सिटीच्या शेफाली भुजबळ (सांस्कृतिक), शर्वरी लथ (आर्किटे्नट), देवयानी फरांदे (नगरसेविका), डॉ. उषा खाबिया (डॉ्नटर), उषाताई शेळके (कर्तृत्व), शोभाताई छाजेड (सहकार), प्रीती कुलकर्णी (ज्योतिष), शोभना बूब, ज्योतीताई देशमुख (सरपंच), रोहिणी नायडू (सामाजिक), अॅड. मिनल खोहर (वकील), शिल्पा शहा, वैजयंती भट (व्नत्या), ज्योती सोनवणे, सुहासिनी कुरकुले, संगीता जाधव, विद्या पाटील, डॉ. कविता बोंडे, उर्मी झालावत आदी महिलांचा समावेश होता. त्याचप्रमाणे आज दिवसभरात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरणदेखील यावेळी करण्यात आले. सूत्रसंचालन दीपक उगले यांनी केले. महिलादिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
|