|
|
|
|
| मुख्य पान | व्हेनेझुएलाचे अध्यक्ष चावेज कालवश |
| व्हेनेझुएलाचे अध्यक्ष चावेज कालवश |
|
| काराकस, दि. ६ (वृत्तसंस्था) - (13-May-2013) |
Tags : International,hugo chavez,death,venezuela,Venezuelan
President Hugo Chavez dies |
काराकस, दि. ६ (वृत्तसंस्था) -
व्हेनेझुएलाचे अध्यक्ष ह्युगो चावेज यांचे बुधवारी पहाटे कर्करोगाने निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. चावेज यांच्या निधनाने लॅटिन अमेरिकेचा एक बुलंद आवाज हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. चावेज यांच्या निधनाचे दु:खद वृत्त ऐकताच शेकडो नागरिक काराकस रस्त्यांवर जमले. ह्युगो चावेझ अमर रहे अशा घोषणा देत, त्यांच्या समर्थकांनी साश्रूनयनांनी त्यांना आदरांजली वाहिली. गेल्या दोन वर्षांपासून ह्युगो कर्करोगासारख्या भयंकर आजाराशी लढत होते. भारतीय वेळेप्रमाणे बुधवारी पहाटे तीन वाजता व्हेनेझुएलाचे शोकमग्न उपाध्यक्ष निकोलस मदुरो यांनी चावेझ यांच्या निधनाचे वृत्त अधिकृतपणे जाहीर केले. |
प्रिंट काढा |
|
|
|