Marathi News Paper
 अकरा दिवसात सहा खून   कांदा व्यापार्‍याकडे मागितली 5 कोटींची खंडणी   Updated on May 21, 2013, 02:26:38 hrs




Fro additional techical assistance

+91 9889748131
+91 9371252322
मुख्य पान | ‘त्या’ दुर्दैवी युवतीला अमेरिकेचा पुरस्कार
‘त्या’ दुर्दैवी युवतीला अमेरिकेचा पुरस्कार
वॉशिंग्टन, दि. ५ (वृत्तसंस्था) -(13-May-2013)
Tags : International
 

वॉशिंग्टन, दि. ५ (वृत्तसंस्था) - दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ रोजी झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्याकांडप्रकरणातील दुर्दैवी युवती अमेरिकेतील पुरस्काराची मानकरी ठरली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यातर्फे दिल्या जाणार्‍या ‘इंटरनॅशनल वुमेन ऑफ करेज अवॉर्ड’च्या विजेत्यांची नावे जाहीर झाली असून, त्यात या युवतीला मरणोत्तर पुरस्कार देण्यात येणार आहे. अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी - फर्स्ट लेडी - मिशेल आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांच्याहस्ते ८ मार्चला (आंतरराष्ट्रीय महिला दिनी) हे पुरस्कार वितरीत केले जाणार आहेत. महिलांचे हक्क आणि सबलीकरण या क्षेत्रात काम करताना प्रसंगी आपला जीव धोक्यात घालणार्‍या आणि असामान्य नेतृत्वगुणांचे प्रदर्शन करणार्‍या जगभरातील महिलांना अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यातर्फे २००७ पासून हे पुरस्कार दिले जातात. आजपर्यंत ४५ देशांतील ६७ महिलांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दुर्दैवी युवतीने आपल्यावर झालेल्या अनन्वित अत्याचारानंतरही जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती तर दाखवलीच पण रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असतानाही दोन वेळा पोलिसांकडे आपला जबाब नोंदवण्याचे धैर्य दाखवले, गुन्हेगारांना शासन झाल्याचे पाहण्याची जिद्द बोलून दाखवली.


प्रिंट काढा