Marathi News Paper
 भोंदू मौलवीकडून तरुणीवर बलात्कार   शर्मा यांचा नवे कॅग म्हणून शपथविधी   शहरात पहिल्या सरोगेट बेबीचा जन्म   लोगों का काम है कहना - साक्षी धोनी   2010 पासूनच श्रीशांत बेटिंगच्रा धंद्यात!   पैसे देऊन मिळते आधारकार्ड   सट्टेबाजांना चार दिवस पोलीस कोठडी   जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त   सीएसकेचे सीईओ मेरप्पन रांना समन्स   Updated on May 24, 2013, 07:33:02 hrs




Fro additional techical assistance

+91 9889748131
+91 9371252322
मुख्य पान | मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत भारतीय!
मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत भारतीय!
न्यूयॉर्क, दि. ५ - (13-May-2013)
Tags : International
 

न्यूयॉर्क, दि. ५ - रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी २१.५ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह सलग सहाव्या वर्षी सर्वांत श्रीमंत भारतीय व्यक्ती ठरले असून, मेक्सिकोचे प्रख्यात उद्योगपती कार्लोस स्लिम हे सलग चौथ्यांदा जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. फोर्ब्ज या विश्‍वविख्यात नियतकालिकाने काल प्रसिद्ध केलेल्या जगभरातील श्रीमंत अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी २२ व्या स्थानावर असून, श्रीमंत भारतीयांच्या यादीत दुसर्‍या स्थानावर असलेले पोलादसम्राट लक्ष्मी मित्तल १६.५ अब्ज डॉलर्स इतक्या संपत्तीसह ४१ व्या स्थानावर आहेत. ७३ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या संपत्तीसह स्लिम यांना जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती घोषित करण्यात आले आहे. त्याखालोखाल मायक्रोसॉफ्टचे मालक बिल गेट्‌स (६७ अब्ज अमेरिकन डॉलर्स), स्पेनचे अमानसियो ओर्टेगा (५७ अब्ज अमेरिकन डॉलर्स), वॉरेट बफेट (५३.५ अब्ज अमेरिकन डॉलर्स) आणि लॅरी एल्लीसन (४३ अब्ज अमेरिकन डॉलर्स) यांचा अव्वल पाचमध्ये समावेश आहे. किमान १ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी संपत्ती असलेल्या जगभरातील १४२६ जणांमध्ये ५५ भारतीय अब्जाधीशांचा समावेश आहे. सर्वांत श्रीमंत भारतीयांमध्ये मुकेश अंबानी आणि लक्ष्मी मित्तल हे अनुक्रमे पहिल्या आणि दुसर्‍या स्थानावर असून, त्याखालोखाल अझीम प्रेमजी, दिलीप शांघवी, शशी व रवी रुईया, कुमारमंगलम बिर्ला, सावित्री जिंदल, सुनील मित्तल, शिव नादर, के. पी. सिंग आणि अनिल अंबानी यांचा क्रमांक लागतो.


प्रिंट काढा