Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 जर्मन बेकरी स्फोटबिलाल शेखला सातपूरमध्ये अटक   कर्जाच्या वाटपावरून जिल्हा बँकेच्या संचालकांत ‘दुफळी’   पुणे बॉम्बस्फोटाचे सूत्रधार जेरबंद   नेवासा हत्याकांड : तपास शून्य!   पं.स.सदस्य नीलेश ढगेंचे पद धोक्यात   कोपरगावात धूमस्टाईलने अडीच लाखांची रस्तालूट   बाभूळगावचे लवकरच पुनर्वसन   मुदत संपलेल्या सरपंचांना प्रशिक्षण !   मानाच्या गणपतीचा वाद यंदाही मिटविणे अशक्य - कृष्णप्रकाश   बिलाल दोषी असेल तर फाशी द्या   Updated on September 9, 2010, 10:38:00 hrs

मुख्य पान | दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार
दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार
भुसावळ (30-July-2010)
Tags : Regional,Maharashtra
 

भुसावळ दि.29 (प्रतिनिधी) - 500 मेगावॅट क्षमतेने वीज निर्मिती करणार्‍या दोन नवीन प्रकल्पांचे काम दीपनगर येथे युध्दपातळीवर सुरू असतांना धूर वाहून नेण्यासाठी उभारण्यात आलेल्या 965 फूट उंच अशा अजस्त्र चिमणीला दि. 28 च्या रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात एका मजुराचा अंत झाला. चिमणी उभारणीचे हे काम महाजनकोने टाटा कंपनीला दिले. टाटाने इंडू कंपनीला व इंडू ने गॅमन इंडिया या कंपनीला कामाचा मक्ता दिला होता. गेल्या दोन वर्षापासून हे काम सुरू आहे. ते आता अंतिम टप्प्यात होते. अपघाताबाबत एका अधिकार्‍याला विचारले असता ते म्हणाले की,या चिमणीमध्ये दोन (ग्लास सोल) धूर बाहेर जाण्यासाठी 10 मीटर व्यासाचे भव्य लोखंडी पाईप वरून खाली बसविले जात होते. एका संचाचे काम पूर्ण झाले होते. दुसरा संच 120 मीटरपर्यंत आला होता. ऑगस्ट महिन्यात त्यांची चाचणी होणार होती. हे पाईप एका लोखंडी गर्डरच्या सहाय्याने एकमेकांना वेल्डींग केले जातात (गर्डर 400 एम.एम.चे होते) जो गर्डर होता त्यावर भार वाढल्याने तो एका बाजूला कलला तो अचानक तुटून इतर संच 4 व संच 5 च्या निर्माणाधिन पाईपावर कोसळला. हजारो टन वजनाचे हे अजस्त्र पाईप एकमेकांवर आदळले व क्षणार्धात उद्ध्वस्त झाल्याचे सांगितले.


प्रिंट काढा