|
|
|
|
| मुख्य पान | ‘राष्ट्रकुल’ यशस्वी झाली तर मी दुःखी - अय्यर |
| ‘राष्ट्रकुल’ यशस्वी झाली तर मी दुःखी - अय्यर |
|
| नवी दिल्ली, दि. 27 (वृत्तसंस्था) (28-July-2010) |
Tags : Ahmednagar,International,Sports |
- अनेक वादग्रस्त वक्तव्ये करून कायम वाद निर्माण करणार्या मणिशंकर अय्यर यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेस पुन्हा एकदा लक्ष्य केले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा यशस्वी झाली तर त्याचे मला सर्वाधिक दुःख होईल. जे या खेळांना राष्ट्रीय भावनेचे स्वरूप देत आहेत ते सैतान आहेत; ते नक्कीच देव नाहीत, असे टीकास्त्र अय्यर यांनी सोडले. अर्थात, अय्यर यांच्या वक्तव्यास सर्वच पक्षाच्या सदस्यांनी आक्षेप घेतला. काही वर्षांपूर्वी क्रीडामंत्री असताना अय्यर यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनास कडवा विरोध केला होता. त्यांनी स्पर्धा केवळ काही दिवसांवर आलेली असताना राज्यसभेत राष्ट्रकुल स्पर्धा संयोजनावर जोरदार आक्षेप घेतला. राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजनात पावसामुळे अडथळे येत असल्यामुळे मी खूश आहे. खरे सांगायचे झाले तर या स्पर्धा यशस्वी झाल्या तर मला जास्त दुःख होईल. या स्पर्धा यशस्वी झाल्यास आशियाई, ऑलिंपिकसारख्या स्पर्धांचे आयोजन होण्यास सुरुवात होईल, अशी मुक्ताफळे अय्यर यांनी उधळली. संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना अय्यर यांच्या टीकेची धार अधिकच तीव्र झाली होती. |
प्रिंट काढा |
|
|
|