Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:40:37 hrs

मुख्य पान | नम्रता कले्नशनसंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
नम्रता कले्नशनसंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
अहमदनगर, दि. 10 (प्रतिनिधी) (11-March-2010)
Tags : Ahmednagar,Crime,Regional,Maharashtra
 

- दिल्लीगेट येथील नम्रता कले्नशन आणि डिजिटल या दुकानाची मोडतोड करून लाखो रुपयांचे नुकसान करणार्‍या श्रीकांत छिंदम आणि साथीदारांविरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी उद्या (गुरुवार) सकाळी दिल्लीगेट येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात येईपर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती श्याम चोरडिया यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या विषयी बोलताना ते म्हणाले की, मंगळवारी रात्री दिल्लीगेट परिसरात राहणार्‍या श्रीकांत छिंदम आणि साथीदारांनी नम्रता कले्नशन आणि डिजिटल या दुकानाची मोडतोड केली. यामध्ये 28 ते 30 लाख रुपयांचे नुकसान झाले. सदर जागा चोरडिया यांनी नारायण कोडम यांच्याकडून 25 वर्षांपूर्वी भाड्याने घेतली होती. मात्र, कोडम यांनी ही जागा एक महिन्यापूर्वी शंकरराव रंगय्या छिंदम यांना विकली. छिंदम आणि त्यांच्या नातेवाईकांनी ‘आम्ही सदरची जागा विकत घेतली असून ती खाली करा’, असा तगादा लावला. आम्ही त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु काहीही न ऐकता छिंदम आणि त्यांच्या साथीदारांनी रात्री दुकानाची मोडतोड करून लाखो रुपयांचे नुकसान केले. गुंडगिरी प्रवृत्ती असलेल्या छिंदम आणि साथीदारांविरुद्ध पोलिस प्रशासनाने कारवाई करावी यासाठी उद्या सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार असल्याचे चोरडिया यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस श्याम चोरडिया आणि त्यांच्या परिवारातील सदस्य तसेच संतोष बोथरा, सुवालाल शिंगवी, प्रेमराज पितळे, सुभाष गुंदेचा, मीना मुनोत आदी उपस्थित होते.


प्रिंट काढा