Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:27:55 hrs

मुख्य पान | पॉंटिंग पहिला आठ हजारी कर्णधार
पॉंटिंग पहिला आठ हजारी कर्णधार
नवी दिल्ली, दि. 10 (वृत्तसंस्था) (11-March-2010)
Tags : Ahmednagar,International,Sports
 

- विक्रमांत सचिनचा पाठलाग करणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉंटिंगने आणखी एका विक्रमाची नोंद आपल्या नावे केली आहे. हैमिल्टन येथे सुरू असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत तिसर्‍या सामन्यात 69 धावांच्या डावात रिकीने 24 वी धाव घेताच एकदिवसीय कर्णधारांच्या यादीत आठ हजार धावा करणारा जगातला पहिला कर्णधार ठरला. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड दरम्यान सुरू आलेल्या चॅपल हेडली एकदिवसीय मालिकेतील तिसर्‍या सामन्यात पॉंटिंगच्या 211 सामन्यांतील 202 डावांत 24 वी धाव घेताच आठ हजार धावांचा ऐतिहासिक पल्ला गाठला. 2002 मध्ये कर्णधारपदी वर्णी झाल्यापासून पॉंटिंगने आतापर्यंत 8 हजार 45 धावा केल्या आहेत. यामध्ये 21 दमदार शतके, 49 अर्धशतकांचा समावेश आहे. या खेळाडूच्या संपूर्ण एकदिवसीय कारकिर्दीवर नजर टाकली असता या कांगारू खेळाडूने 343 एकदिवसीय सामन्यांतील 334 डावांत 43.24 च्या सरासरीने 12 हजार 845 धावा ठोकल्या आहेत. यामध्ये 29 शतके आणि 77 अर्धशतकांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा करण्याचा मानही या बहाद्दरानेच पटकाविला आहे. मास्टर ब्लास्टरच्या विश्वविक्रमांचा पाठलाग करणार्‍या पॉंटिंगने आतापर्यंत 29 एकदिवसीय शतके तर सचिनने 46 शतके पूर्ण केली आहेत. पॉंटिंग दुसर्‍या क्रमांकावर आहे, तर कसोटीत पॉंटिंगने 39 शतके पूर्ण केली आहेत. रिकीने 15 फेब्रुवारी 1995 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याच्या खेळाचे संतुलन आणि संघ नेतृत्व पाहून त्याच्याकडे 2002 मध्ये कर्णधारपदाची धुरा सोपविण्यात आली. पॉंटिंगच्या नेतृत्वाखाली संघाने आतापर्यंत 2003, 2007 चा विश्वचषक तसेच 2006, 2009 चा आयसीसी चॅम्पियन चषक पटकाविला आहे. 2003 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पॉंटिंगने 159 धावांची दमदार खेळी करून भारतीय संघाला पराभूत केले होते. याखेरीज स्टिव वॉच्या कारकिर्दीत 2009 च्या विश्वचषक स्पर्धेतही पॉंटिंगने संघात चमकदार कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियाने अॅलन बॉर्डरच्या नेतृत्वाखाली पहिला विश्वचषक जिंकला होता. आजपर्यंत कांगारुंनी चार विश्वचषकांत आपला झेंडा रोवला आहे.


प्रिंट काढा