Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:41:01 hrs

मुख्य पान | सचिन तेंडुलकरच्या सह्यांतून 11 लाखांची मदत
सचिन तेंडुलकरच्या सह्यांतून 11 लाखांची मदत
मुंबई, दि. 10 (वृत्तसंस्था) (11-March-2010)
Tags : Ahmednagar,International,Sports
 

- आयपीएलचे सामने मल्टिप्लेक्स चित्रपटगृहातून दाखविण्यात येणार आहेत. यासाठी विक्री होणार्‍या तिकिटांवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सह्या आहेत. या सह्या असलेल्या तिकिटांचा लिलाव करण्यात आला असून त्यातून 11 लाख रुपयांची कमाई झाली आहे. लिलावाची किंमत पाच लाख रुपये ठेवण्यात आली होती. ती वाढत जाऊन 11 लाखांवर पोहोचली. ही रक्कम चॅरिटेबल संस्था अपनालयला देण्यात येणार आहे. चित्रपटगृहातील पहिल्या सामन्याचे तिकीट जारी करताना सचिन म्हणाला, दीर्घ काळापासून मी अपनालय या संस्थेला मदत करीत आहे. आता ज्या बॅटने द्विशतक केले त्याचाही आपण लिलाव करणार असून ते पैसेही चॅरिटीसाठी देणार आहे. आयपीएलचे सामने दाखविण्यात येणार्‍या सर्व चित्रपटगृहांत सचिनची बॅट प्रदर्शित केली जाणार आहे. त्यानंतर तिचा लिलाव होईल. राज्यसभेत सचिनला भारतरत्न देण्याची मागणी एकदिवसीय सामन्यात द्विशतकाचा विश्वविक्रम करणार्‍या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी राज्यसभेत करण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी ही मागणी केली. खा. रणजितसिंह मोहिते म्हणाले की, गेल्या दोन दशकांपासून सचिन सातत्यपूर्ण कामगिरी करीत आहे. त्याने क्रिकेटमधील अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. यामुळे देशातील युवकांचा तो आदर आहे. त्याच्या या कामगिरीमुळे सरकारने त्याला भारतरत्न पुरस्कार दिलाच पाहिजे.


प्रिंट काढा