Marathi News Paper
  नाशिक   जळगाव   धुळे   नंदुरबार   अहमदनगर   सार्वमत
 ला.ना. शाळेत व्हायरसचे भूत, 40 विद्यार्थ्यांना बाधा   रङ्गींच्या सन्मानार्थ संगीत अकादमी   मुंबईत मलेरियाचे 11 हजार रूग्ण   ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सखाराम ह. देशपांडे कालवश    पोलिसांना माझे एन्काऊंटर करायचेय : सालेम   चतुर्थीच्या मुहूर्तावर सचिनचे पाचवे द्विशतक, रैनाचे शतक   ‘शिधापत्रिका हा रहिवासाचा पुरावा नाही’   मामांच्या मारहाणीत भाचेजावई ठार   दीपनगर वीज प्रकल्पातील चिमणी कोसळली, 1 ठार   आमदार कोतवालांच्या प्रयत्नाने चांदवड तालुक्यातील धार्मिक स्थळ विकासासाठी 1 कोटी   Updated on July 30, 2010, 00:23:29 hrs

मुख्य पान | तोफगोळ्याच्या स्फोटात तीन ठार
तोफगोळ्याच्या स्फोटात तीन ठार
सिमला, दि. 10 (वृत्तसंस्था) (11-March-2010)
Tags : Ahmednagar,Crime,National
 

- हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात सैन्य दलाच्या फायरिंग रेंजजवळ झालेल्या तोफगोळ्यांच्या स्फोटात तीन मुले ठार झाली. ही मुले वापरल्या गेलेल्या गोळ्यातून पितळ काढण्याचा प्रयत्न करीत होते. हिमाचल प्रदेशातील कांगडा खोर्‍यातील लष्कराच्या गोळीबार मैदानाजवळच्या जंगलात, 10 ते 12 वर्षे वयाची तीन मुले मंगळवारी मृतावस्थेत सापडली. टाकून दिलेल्या तोफगोळ्यांपैकी एकाचा काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास स्फोट झाल्यामुळे ते ठार झाल्याचा अंदाज जिल्हा पोलिस अधिक्षक अतुलकुमार फुलझेले यांनी व्य्नत केला. मृतांची ओळख पटली असून, ते जवळच्याच कोहाला खेड्यातील होते, असे सांगून ते म्हणाले, की आडबाजूला पडून राहिलेल्या या तोफगोळ्याजवळ ते खेळत असतानाच ही घटना घडली असावी. घटनेचे वृत्त समजताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी आसपास आणखी काही तोफगोळे बेवारस स्थितीत पडल्याचे दिसून आले.


प्रिंट काढा